१० हजारांच्या सवलतीसह मिळतेय 'ही' e-Scooter, ११ शहरांमध्ये घेऊ शकता टेस्ट राइडचा आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 03:13 PM2022-11-29T15:13:08+5:302022-11-29T15:13:44+5:30
ola electric s1 and s1 pro : ओला इलेक्ट्रिकने बंगलुरूमध्ये 3, पुण्यात 2 आणि अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, कोटा, नागपूर, रांची आणि बडोदा येथे प्रत्येकी एक एक्सपिरियन्स सेंटर उघडले आहे.
नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच देशातील 11 शहरांमध्ये 14 नवीन एक्सपिरियन्स सेंटर्स (अनुभव केंद्रे) सुरू केली आहेत. डी 2 सी (डायरेक्ट टू कस्टमर) पर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने कंपनीने 2022 च्या अखेरीस 200 आउटलेट उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या कंपनीची देशभरात अशी 50 हून अधिक एक्सपिरियन्स सेंटर्स आहेत.
ओला इलेक्ट्रिकने बंगलुरूमध्ये 3, पुण्यात 2 आणि अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, दिल्ली, हैदराबाद, कोटा, नागपूर, रांची आणि बडोदा येथे प्रत्येकी एक एक्सपिरियन्स सेंटर उघडले आहे. या एक्सपिरियन्स सेंटरद्वारे, संभाव्य खरेदीदार ओलाच्या ईव्ही टेक्नॉलॉजीवर पहिल्यांदा नजर टाकू शकतात आणि स्कूटरशी संबंधित कोणतीही माहिती मिळवू शकतात. तसेच, ग्राहक S1 आणि S1 Pro च्या टेस्ट राइडचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या खरेदीवर तुम्हाला फायनान्सशी संबंधित महत्त्वाची माहितीही मिळू शकते.
स्कूटरवर मिळतेय ऑफर!
कंपनीने गेल्या महिन्यात दिवाळी दरम्यान जाहीर केलेली फेस्टिव्ह सीजन ऑफर 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. ग्राहक S1 आणि S1 Pro स्कूटर 10,000 रुपयांपर्यंत सूटसह निवडक एक्सपिरियन्स सेंटरद्वारे 7-दिवसांच्या डिलिव्हरीसह खरेदी करू शकतात. ओला इलेक्ट्रिक आपल्या एक्सपिरियन्स सेंटरर्सद्वारे भारतातील 1 लाखाहून अधिक ग्राहकांना टेस्ट राइड ऑफर करते. याचबरोबर, ओला इलेक्ट्रिक एक्सपिरियन्स सेंटर्स कंपनीच्या स्कूटरच्या विक्रीनंतरची देखभाल करण्यासाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणूनही काम करतात. या इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro मध्ये इको मोडसह म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियन अॅप आणि रिव्हर्स मोड यासारख्या अनेक अॅडव्हॉन्स फीचर्ससह येतात.
कंपनीचे सीएमओ काय म्हणाले?
ओला इलेक्ट्रिकचे सीएमओ अंशुल खंडेलवाल म्हणाले की, "ईव्ही खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना पहिल्यांदा वाहनाचा अनुभव घेणे आवडते. ओला एक्सपिरियन्स सेंटरमध्ये, ग्राहक आमच्या उत्पादनांना स्पर्श करू शकतात आणि अनुभवू शकतात, टेस्ट राइड आणि सर्व संबंधित माहिती एकाच छताखाली मिळवू शकतात. जास्तीत जास्त लोकांना आमची उत्पादने सर्वोत्तम मार्गाने अनुभवता यावीत याची खात्री करण्यासाठी, आम्ही या वर्षाच्या अखेरीस अशी एकूण 200 एक्सपिरियन्स सेंटर्स उघडण्याच्या उद्देशाने देशभरात आमची ऑफलाइन फूटप्रिंट झपाट्याने वाढवत आहोत."