Ola E scooter मध्ये रिव्हर्स गिअर? मागे जाणाऱ्या स्कूटरचा व्हिडीओ, त्यावर सीईओंचेही 'उलटे' संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 03:53 PM2021-08-07T15:53:20+5:302021-08-07T15:58:31+5:30
Ola Electric scooter reverse gear: भावेश यांनी 17 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्कूटरद्वारे रिव्हर्स ड्रायव्हिंग केली जात असल्याचे दाखविण्यात आले आहे.
ओला आपली पहिली इलेक्ट्रीक स्कूटर (Ola Electric Scooter ) 15 ऑगस्टला लाँच करणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती करण्यात येत असून कंपनीचे सीईओ भावेश अग्रवाल सोशल मीडियावर सतत काही ना काही तर वेगळे असे पोस्ट करू लागले आहे. भावेश हळूहळू स्कूटरचे फीचर्स रोल आऊट करत असले तरी देखील आज त्यांनी ज्या गोष्टीचा खुलासा केला आहे, त्यावरून ओलाची स्कूटर कल्ला करणार आहे एवढे नक्की. (Ola Scooter new feature revealed: Ride in reverse. Details here)
Ola Scooter ची थेट घरी देणार डिलिव्हरी; 10 रंगात, कर्ज प्रक्रिया, सर्व्हिस कशी मिळणार, जाणून घ्या...
भावेश यांनी 17 सेकंदांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये स्कूटरद्वारे रिव्हर्स ड्रायव्हिंग केली जात असल्याचे दाखविण्यात आले आहे. खरोखरच एवढ्या वेगात आणि चपखलपणे मध्ये सिग्नल कोन ठेवून स्कूटर मागे नेली जात नसली तरी देखील त्यांना ओला स्कूटरमध्ये रिव्हर्स गिअर आहे हे सांगायचे आहे. यासाठी व्हिडीओ एडीट केला असेल हे नक्की असले तरी त्यांनी या व्हिडीओवर देखील उलट लिहिले आहे.
Ola electric scooter ची प्रतिक्षा अखेर संपली; कंपनीकडून लाँचिंग तारीख जाहीर
या व्हिडीओमध्ये सुरुवातीच्या सहा सेकंदांत स्कूटर रिव्हर्स जात आहे. भावेश यांनी यासोबत '!won em ot netsiL' असे कॅप्शन दिले आहे. तुम्हाला हे काय आहे हे कळलेले नसले तरी त्याचे उलट केल्यास Listen to me now! असे लिहिले आहे. रस्त्याच्या मधे ट्रॅफिक कोन ठेवण्यात आले आहेत. ते रिव्हर्समध्ये क्रॉस करत असल्याचे दाखविण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे रायडरचा चेहरा पुढील बाजुला आहे.
!won em ot netsiL
— Bhavish Aggarwal (@bhash) August 7, 2021
A revolution to Reverse climate change! See you on 15th August at https://t.co/lzUzbWbFl7#JoinTheRevolution@OlaElectricpic.twitter.com/WXXn3sD8CN
Ola Scooter 15 ऑगस्टला लाँच केली जाणार आहे. तसेच या स्कूटरचा कोणताही डीलर नेमण्यात येणार नाहीय. म्हणजेच तुमच्या आजुबाजुला या स्कूटरचे शोरुम नसणार आहे. यामुळे ही स्कूटर थेट घरी डिलिव्हर केली जाणार आहे. ola Electric आपल्या Series-S स्कूटरच्या डिलिव्हरीसाठी ‘डायरेक्ट-2-कंज्यूमर’ (D2C) मॉडेल अवलंबणार आहे. थेट ग्राहकाच्या घरी नेऊन ही स्कूटर दिली जाणार आहे. Ola Electric व्हेईकल मॅन्युफॅक्चरर कंपनी नाही तर टेक मोबिलिटी स्टार्टअप म्हणून संबोधत आहे. ओला स्कूटर केवळ घरी डिलिव्हर केली जाणार नाही, तर पुढच्या सर्व्हिसेस देखील दारातच येऊन दिल्या जाणार आहेत. यामुळे डीलरशीपचे पैसे वाचणार आहेत. (When Ola Electric scooter launch? )
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज