OLA Electric Scooter: ओला स्कूटरचा गौडबंगाल! किंमत दाखवतेय एक, घेतेय भलतीच
By हेमंत बावकर | Published: September 15, 2021 03:38 PM2021-09-15T15:38:15+5:302021-09-15T15:53:18+5:30
how much Ola Electric Scooter Final Price in Maharashtra, Pune: दोन दिवसांपूर्वी एथरने महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडी लाईव्ह झाल्याने 24000 रुपयांनी स्कूटरची किंमत कमी केली होती. म्हणजे सबसिडीचा फायदा कंपनीने थेट ग्राहकांना दिला होता. तशीच किंमत ओलानेही आज त्यांच्या वेबसाईटवर दाखविली.
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची (Ola's e-scooter) विक्री अखेर आजपासून सुरु झाली. ८ सप्टेंबरला तांत्रिक बिघाडामुळे विक्री होऊ शकली नव्हती. ओलाने आज ज्यांनी स्कूटर बुक केली होती त्यांना मेसेज पाठविले. ओलाने जेव्हा स्कूटर लाँच केली तेव्हा कमी रेंजच्या मॉडेल एस 1ची किंमत 99,999 रूपये आणि Ola S1 Pro ची किंमत 1,29,999 रूपये एवढी ठेवण्यात आली होती. मात्र, आज ग्राहकांना पाठविलेल्या लिंकमध्ये महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडीनंतरची किंमत ola s1 ची 75099 आणि Ola S1 Pro ची 100149 एवढी दाखविली होती. परंतू खरेदी करण्यासाठी गेल्यास त्यावर लाँचिंगवेळचीच किंमत आकारली जात असल्याने गोंधळ उडालेला आहे. ओलाला नेमकी त्यांच्या स्कूटरची किंमतच माहिती नसल्याचे यावरून दिसत आहे. (OLA Electric Scooter price difference when final payment booking. )
Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...
दोन दिवसांपूर्वी एथरने महाराष्ट्रातील ईव्ही सबसिडी लाईव्ह झाल्याने 24000 रुपयांनी स्कूटरची किंमत कमी केली होती. म्हणजे सबसिडीचा फायदा कंपनीने थेट ग्राहकांना दिला होता. तशीच किंमत ओलानेही आज त्यांच्या वेबसाईटवर दाखविली. परंतू खरेदी करताना ओला मूळ किंमतच आकारत आहे. तसेच महाराष्ट्रात फक्त 5000 रुपयेच सबसिडी मिळेल असे दाखवत आहे.
Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात
ओलाच्या स्कूटरची नेमकी किंमत किती? (how much Ola Electric Scooter Final Price in Pune)
पुण्यातील ग्राहकाने ओलाची स्कूटर (OLA Electric Scooter) बुक करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला ओलाच्या एस १ प्रो स्कूटरची किंमत 1,63,549 रुपये एवढी दाखविण्यात आली आहे. तर होम चार्जरसाठी 9000 रुपये आणि परफॉर्मन्स अपग्रेडसाठी 17000 रुपये अधिकचे दाखविण्यात येत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ओलाने FAME-2 सबसिडी 59,550 एवढी दाखविलेली आहे. असे करून ओलाची स्कूटर ही 1,29,999 रुपयांना पडते. त्यातही 7706 रुपयांचा इन्शुरन्स आणि हेल्मेट 1299 रुपयांना माथी मारलेले आहे. 2138 रुपयांचा रजिस्ट्रेशन टॅक्स पकडून जर पुण्याच ही स्कूटर खरेदी करायची असेल तर 1,40,643 रुपये तुम्हाला मोजावे लागणार आहेत. एस १ साठी 1,10,356 रुपये मोजावे लागणार आहेत. राज्याच्या सबसिडीचे 5000 रुपये तुम्हाला तुमच्यापरीने क्लेम करावे लागणार आहे.