बाबो! Ola Electric ची चांदीच चांदी; एका दिवसात विकल्या 600 कोटींच्या स्कूटर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 04:24 PM2021-09-16T16:24:24+5:302021-09-16T16:25:19+5:30
Ola Electric Scooter : प्रति सेकंद चार ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिकच्या इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बुधवार 15 सप्टेंबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्यापासून कंपनीला 600 कोटी रुपयांच्या एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरचे बुकिंग मिळाले आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाविश अग्रवाल यांनी ट्विटरवर सांगितले आहे. (ola electric received record rs 600 crore worth of bookings in one day for s1 e scooter)
तसेच, प्रति सेकंदात चार ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटर विकल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह, कंपनीने आतापर्यंत 86 हजार स्कूटरच्या विक्री ऑर्डरचा आकडा गाठला आहे, जो आतापर्यंत ऑटोमोबाईल उद्योगात ऐतिहासिक आहे. गुरुवारी बुकिंगचा शेवटचा दिवस आहे आणि मध्यरात्रीनंतर खरेदी बंद होईल, असे भाविश अग्रवाल यांनी म्हटले आहे.
India is committing to EVs and rejecting petrol! We sold 4 scooters/sec at peak & sold scooters worth 600Cr+ in a day! Today is the last day, purchase will shut at midnight. So lock in this introductory price and buy on the Ola app before we sell out! https://t.co/TeNiMPEeWXpic.twitter.com/qZtIWgSvaN
— Bhavish Aggarwal (@bhash) September 16, 2021
ओला एस 1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1 लाख रुपये आहे, तर एस 1 प्रोची किंमत 1.30 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरूममधील आहेत आणि राज्य अनुदानावर अवलंबून बदलू शकतात. ओला ए 1 ची सिंगल चार्जिंगनंतर रेंज 120 किमी आहे, तर एस 1 प्रो ची रेंज 180 किमी आहे. एस 1 प्रो ला मोठी बॅटरी मिळते, तर त्याची टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे. ओला एस 1 मॉडेलमध्ये 2.98 केडब्ल्यूएच बॅटरी आहे, तर एस 1 प्रोमध्ये 3.97 केडब्ल्यूएच बॅटरी आहे.
(OLA देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, ई-स्कूटर प्लांट फक्त महिलाच चालविणार)
दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण एलईडी लाइटिंग पॅकेज आणि 7.0-इंच टच डिस्प्लेसह येतात, ज्यामध्ये नेव्हिगेशनचे देखील फीचर मिळते. डिस्प्ले 3-जीबी रॅमसह ऑक्टा-कोर प्रोसेसर दिले आहे आणि वाय-फाय, ब्लूटूथ आणि 4 जी कनेक्टिव्हिटी सुद्धा आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या निर्मितीसाठी ओलाने 10 हजार महिलांना काम दिले आहे. तसेच वर्षाला 20 लाख स्कूटर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि लॅटिन अमेरिकेतही या स्कूटरची निर्यात केली जाणार आहे.
(केवळ 'अशा' पद्धतीनं खरेदी करू शकता Ola Electric Scooter; पाहा स्टेप बाय स्टेप प्रक्रिया)
ओलाने डायरेक्ट टू होम सेल्स मॉडेलची निवड केली आहे आणि कोणतेही फिजिकल स्टोअर उघडले नाही. इच्छुक ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवर लॉग इन करून 499 रुपयांची बुकिंग रक्कम भरून स्कूटर बुक करू शकतात. ग्राहकांना 'आधी रिझर्व्ह करा, आधी मिळवा' या तत्त्वावर डिलिव्हरी मिळेल. कंपनीच्या मते, ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्ट ड्राइव्ह आणि डिलिव्हरी ऑक्टोबरपासून सुरू होईल, तसेच कंपनी ग्राहकांना त्यांचे स्कूटर खरेदी करण्यासाठी लोन आणि ईएमआय सुविधाही देत आहे, त्यासाठी अनेक कंपन्यांशी करार केला आहे.
(Ola, Simple One ला घाबरली! Ather 450 Plus इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतीत मोठी कपात)
ओला इलेक्ट्रिकने 7 सप्टेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एस 1 स्कूटर प्रति महिना 2,999 रुपयांच्या समान मासिक हप्त्यावर (ईएमआय) उपलब्ध होईल. तर, या इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस 1 प्रोच्या अॅडव्हान्स व्हर्जनसाठी ईएमआय 3,199 रुपयांपासून सुरू होईल. कंपनीचे म्हणणे आहे की, बुकिंगची रक्कम किंवा कोणत्याही आगाऊ पेमेंट जोपर्यंत रिफंड केले जाऊ शकते, तोपर्यंत ते युनिट तामिळनाडूमधील कारखान्यातून ग्राहकांच्या पत्त्यावर पाठवले जात नाही.