Ola Electric Scooter: ओलाच्या ग्राहकांची मौज! S1 इलेक्ट्रीक स्कूटरला फ्रीमध्ये S1 Pro मध्ये अपग्रेड करणार कंपनी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 10:38 AM2022-01-18T10:38:44+5:302022-01-18T10:40:37+5:30
Ola Electric Scooter free upgrade: ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे.
जर तुम्ही ओलाची स्कूटर बुक केली असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कालच कंपनीने ओला एस१ स्कूटरचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्या आधीच कंपनीने ओलाची एस१ स्कूटर ज्या लोकांनी बुक केली आहे त्यांना ओला एस१ प्रो अधिकचे पैसे न घेता दिली जाणार आहे.
ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. ओला एस१ च्या स्कूटरची मागणी केलेल्या ग्राहकांना कंपनी Ola S1 Pro हार्डवेयर देणार आहे. जर ओला एस १ प्रोची फिचर्स वापरायची असतील तर तुम्हाला त्यासाठी जादाचे पैसे द्यावे लागणार आहेत.
ओला एस१ ची रेंज १२१ किमी आणि एस १ प्रो ची रेंज १८१ किमी आहे. यामुळे लोकांनी जास्त रेंजच्या स्कूटरला पसंती दिली आहे. ज्या लोकांचा प्रवास खूप कमी आहे त्यांनी एस१ प्रोची मागणी नोंदविली होती. यापैकी ज्या लोकांनी स्कूटरचे सर्व पैसे अदा केले आहेत किंवा सुरुवातीचे २०००० रुपये दिले आहेत त्यांना ही ऑफर मिळण्याची शक्यता आहे. येत्या २१ जानेवारीला उर्वरित रक्कम भरण्यासाठी या ग्राहकांना विंडो खुली केली जाणार आहे.
We’re upgrading all our S1 customers to S1 Pro hardware. You’ll get all S1 features and can unlock Pro range, hyper mode, other features with a performance upgrade.
— Bhavish Aggarwal (@bhash) January 15, 2022
Thank you for being early supporters of Mission Electric!
Dispatch in Jan, Feb. Email to follow with details.
Ola Electric Scooter: ओलाने इलेक्ट्रीक स्कूटर एस१ चे उत्पादन बंद केले; ग्राहकांना संदेश गेले
ओलाच्या एस१ प्रो स्कूटरला मोठी मागणी आहे. यामुळे कंपनीने याच स्कूटरकडे लक्ष पुरविले असून एस१ ची बुकिंग केलेल्यांना सुरुवातीला ओलाने एस१ प्रोचे हार्डवेअर असलेली स्कूटर दिली होती. मात्र, त्यांना सॉफ्टवेअर, अन्य बाबी या बेसिक दिल्या आहेत. परंतू आता कंपनीने असे न करता या स्कूटरचे उत्पादनच थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना तसे मेल करण्यात आले असून त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत.