Ola Electric Scooter S1 Delivered: ओला स्कूटरचे रडगाणे! पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भ्रमनिरास; जाणून घ्या काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 08:23 PM2021-12-16T20:23:49+5:302021-12-16T20:24:52+5:30

Customers unhappy with Ola Electric Scooters: ओलाने अशा अर्धवट स्कूटर दबावातून डिलिव्हर केल्याचे सांगितले जात आहे. आधीच डिलिव्हरीसाठी उशीर झाला होता, त्यात दोनदा कंपनीने डिलिव्हरीचे तारीख बदलली होती. आता पुन्हा बदलली तर कंपनीवर मोठी नामुष्की ओढविणार होती.

Ola Electric Scooter S1 Delivered: Disillusionment of 100 customers on the first day; missing some features | Ola Electric Scooter S1 Delivered: ओला स्कूटरचे रडगाणे! पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भ्रमनिरास; जाणून घ्या काय घडले...

Ola Electric Scooter S1 Delivered: ओला स्कूटरचे रडगाणे! पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भ्रमनिरास; जाणून घ्या काय घडले...

googlenewsNext

ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरने पहिल्या १०० ग्राहकांचा पुरता भ्रमनिरास केला आहे. ओलाने रडतखडत बुधवारी १०० स्कूटर डिलिव्हर केल्या, परंतू दुसऱ्याच दिवशी हे ग्राहक निराश झाले आहेत. ओलाने जे दाखविले त्यातील काही फिचर्स यामध्ये नाहीत, अशी तक्रार या ग्राहकांनी केली आहे. (100 Ola Electric Scooter's Delivered)

ओला इलेक्ट्रीकने बंगळुरु आणि चेन्नईमध्ये Ola S1 स्कूटरची पहिली १०० युनिट विकली. यासाठी कंपनीने मोठा ईव्हेंट आयोजित केला होता. बंगळुरूच्या मुख्यालयात स्कूटरची डिलिव्हरी घेण्यासाठी 40 ग्राहक आले होते. या इव्हेंटला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल देखील होते. 

कोणते फिचर्स मिसिंग....
Ola Scooter मध्ये जाहिरात करताना, लाँचिंगवेळी भरमसाठ फिचर दाखविण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात डिलिव्हरी मिळाल्यावर ग्राहकांना फसवणूक झाल्यासारखे वाटू लागले आहे. स्कूटरला मोबाईलद्वारे नियंत्रित करणारे अॅप, हिल होल्ड, क्रूझ कंट्रोल, व्हॉईस कमांड आणि ब्लूटूथ सारखे फिचर्सच नसल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे. 

ग्राहकांनी तक्रार करताच कंपनीने हे फिचर्स नंतर ऑनलाईन अपडेट केले जातील असे सांगितले आहे. यासाठी जवळपास १ महिना लागण्याची शक्यता आहे. तर ओला इलेक्ट्रीकचे मुख्य मार्केटिंग अधिकारी वरुण दुबे यांनी सांगितले की, काही फिचर्स सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर काम करू लागतील. 

ओलाने अशा अर्धवट स्कूटर दबावातून डिलिव्हर केल्याचे सांगितले जात आहे. आधीच डिलिव्हरीसाठी उशीर झाला होता, त्यात दोनदा कंपनीने डिलिव्हरीचे तारीख बदलली होती. आता पुन्हा बदलली तर कंपनीवर मोठी नामुष्की ओढविणार होती. ऑक्टोबर, नोव्हेंबर असे करत 15 डिसेंबरला ओलाने स्कूटर डिलिव्हर केली. 

ड्रायव्हिंग रेंज आणि स्पीड
Ola S1 व्हेरिएंट एकदा फुल चार्ज केल्यानंतर 121 किमी अंतर कापू शकते. तर S1 Pro प्रकार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 181 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. S1 व्हेरिएंट 3.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेगाने धावते, तर S1 Pro व्हेरिएंट 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.

Web Title: Ola Electric Scooter S1 Delivered: Disillusionment of 100 customers on the first day; missing some features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Olaओला