Ola Electric Scooter: लॉन्चिंगआधी टीजर आला समोर; Ola Electric Scooter मध्ये मिळणार अनेक शानदार फिचर्स, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 04:33 PM2021-07-14T16:33:34+5:302021-07-14T16:36:10+5:30
Ola Electric Scooter will launch soon: ओलाच्या फ्युचर फॅक्टरीचा पहिला टप्पा केवळ चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. भाविश यांनी ओलाच्या या स्कूटरमध्ये कोणती फिचर्स मिळतील याची हिंटही दिली आहे.
Ola Electric Scooter (ओला इलेक्ट्रिक स्कूटर) लवकरच भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार आहे. ओला इंडियाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाद्वारे या स्कूटरची एक झलक दाखविली आहे. यात त्यांनी ही स्कूटर रस्त्यावर कसे कामगिरी करेल याची माहिती दिली आहे. या ई-स्कूटरचे उत्पादन लवकरच सुरु होणार असल्याचे ते म्हणाले आहेत. (Ola Electric Scooter teaser out before launch in India.)
ओलाच्या फ्युचर फॅक्टरीचा पहिला टप्पा केवळ चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. भाविश यांनी ओलाच्या या स्कूटरमध्ये कोणती फिचर्स मिळतील याची हिंटही दिली आहे. या ओला स्कूटरमध्ये बेस्ट ईन क्लास बूट स्पेस (दोन हेल्मेट ठेवण्याएवढी जागा), बेस्ट-इन-क्लास राइडिंग रेंज सारखी फिचर असणार आहेत. अॅप बेस्ड कीलेस अॅक्सेस देखील मिळणार आहे. तसेच नेव्हिगेशन आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स मिळणार आहेत.
Got these crazy ads from the marketing team 🤦🏼♂️. Don’t know what they were thinking, hopeless fellows 😡! Giving up on these guys. Can you all help me with some ideas, I have a launch coming up soon! @OlaElectricpic.twitter.com/fXw2ZNsdma
— Bhavish Aggarwal (@bhash) July 10, 2021
या स्कूटरचा वेग एवढा आहे की, भाविश यांनी एका ट्विटचा हवाला देत ते वाचून होईस्तोवर ती स्कूटर 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग पकडते. या महिन्याच्या अखेरीस या स्कूटरची किंमत जाहीर (Ola Electric Scooter price) केली जाण्याची शक्यताआहे. ही स्कूटर Ather 450X सारख्या ईलेक्ट्रीक स्कूटरला कडवी टक्कर देणार आहे.
Almost there! Scooter production to begin soon! Get on the waitlist and #JoinTheRevolution@OlaElectrichttps://t.co/ZryubLLo6Xpic.twitter.com/Pe2iGbFqKQ
— Bhavish Aggarwal (@bhash) July 7, 2021
सध्या बाजारात असलेल्या ईव्ही स्कूटरची रेंज ही 70 ते 100 च्या आसपास आहे. तर त्या चार्ज करण्यासाठीदेखील तासंतास लागतात. परंतू ओलाची स्कूटर अवघ्या 5 मिनिटांत फूल चार्ज होणार आहे. म्हणजेच पेट्रोल भरण्यासाठी रांगेत राहून ते पेट्रोल पंपावरून पैसे देऊन बाहेर पडण्याचा जो वेळ आहे त्यापेक्षा कमी वेळात ही स्कूटर चार्ज होणार आहे. तसेच या स्कूटरची रेंजही जास्त असणार आहे. या पहिल्या स्कूटरची झलक ओलाने दिली आहे.
Took this beauty for a spin! Goes 0-60 faster than you can read this tweet! Ready or not, a revolution is coming! #JoinTheRevolution@Olaelectrichttps://t.co/ZryubLLo6Xpic.twitter.com/wPsch79Djf
— Bhavish Aggarwal (@bhash) July 2, 2021
ही स्कूटर एका चार्जमध्ये 240 किलोमीटर जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एक्ट्रा बॅटरी बाळगली तर याची रेंज दुप्पट होणार आहे. या प्रक्रियेलाही केवळ ५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. स्वॅपेबल बॅटरी म्हणजे डिस्चार्ज बॅटरीच्या जागी दुसरी बॅटरी लावता येते. इतर फिचर आता हळूहळू समोर येणार आहेत. परंतू ही सुविधा मोठमोठ्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
दर दोन सेकंदाला...एक! Ola ची Electric scooter येतेय; फक्त 5 मिनिटांत फूल चार्ज होणार
500 एकरावर प्रकल्प
ओला या स्कूटर बनविण्यासाठी बंगळूरूमध्ये 500 एकरावर भलामोठा प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीच्या टॉपच्या पदाधिकाऱ्यांनी आंब्याची बाग असलेली जागा पाहिली आहे. या जागेत पुढील 12 महिन्यांत हा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकरल्पात वर्षाला दोन दशलक्ष स्कूटर तयार केल्या जाणार आहेत.