Ola EV subsidy: ओला स्कूटर बुक केली असेल तर...; 66,000 रुपयांपर्यंत नुसती सबसिडीच मिळणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 05:17 PM2021-07-24T17:17:46+5:302021-07-24T17:18:30+5:30

Ola Electric scooter subsidy: या स्कूटरची अद्याप किंमत किती असेल हे बाहेर आलेले नसले तरी देखील या स्कूटरवर मिळणारी बससिडी पाहून तुमचे डोळे गांगरणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने इलेक्ट्रीक स्कूटर, कारवर सबसिडी जाहीर केल्या आहेत.

Ola Electric scooter will get subsidy up to Rs 66,000 from central, Maharashtra government, see price... | Ola EV subsidy: ओला स्कूटर बुक केली असेल तर...; 66,000 रुपयांपर्यंत नुसती सबसिडीच मिळणार, जाणून घ्या...

Ola EV subsidy: ओला स्कूटर बुक केली असेल तर...; 66,000 रुपयांपर्यंत नुसती सबसिडीच मिळणार, जाणून घ्या...

googlenewsNext

ओला इलेक्ट्रीक स्कूटर लवकरच भारतात लाँच होणार आहे. या स्कूटरची बुकिंग 15 जुलैपासून सुरु झाली असून 499 रुपये बुकिंग असल्याने लोकांच्या उड्या पडल्या आहेत. यामुळे पहिल्याच दिवशी ओलाला 1 लाखाहून अधिक बुकिंग मिळाली आहे. जगातील सर्वाधिक बुकिंग मिळालेली स्कूटर बनली आहे. (Ola scooter subsidy by central government and Maharashtra government, calculation)

Yamaha Fascino 125 FI Hybrid: देशातील पहिली हायब्रिड स्कूटर लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...

या स्कूटरची अद्याप किंमत किती असेल हे बाहेर आलेले नसले तरी देखील या स्कूटरवर मिळणारी बससिडी पाहून तुमचे डोळे गांगरणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारने इलेक्ट्रीक स्कूटर, कारवर सबसिडी जाहीर केल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रीक स्कुटरच्या किंमती या 42-57% पर्यंत कमी होणार आहेत. (how much ola scooter cost after subsidy in Maharashtra.)

Ola electric scooter चे तुफान बुकिंग; जगात बनविला रेकॉर्ड, जाणून घ्या 24 तासांत काय घडले...

गणित समजून घ्या...
हीरो ऑप्टिमा ईव्हीची किंमत 1.22 लाख रुपये असेल तर केंद्र सरकार 39 हजार आणि दिल्ली राज्य सरकार 15000 रुपए सबसिडी देते. महाराष्ट्र सरकारने देखील गेल्या आठवड्यात ईव्ही पॉलिसी जाहीर केली आहे. यानुसार ईव्ही वाहनांवर 2.75 लाख रुपयांपर्यंत सबसिडी देण्यात येणार आहे. यानुसार रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स फ्री करण्यात आला आहे. यामुळे या एकंदरीत सबसिडीचा विचार करता 54000 रुपयांपर्यंतचा फायदा होणार आहे. म्हणजेच हीरो ऑप्टिमा 64 हजार रुपयांना पडेल. 

केंद्र सरकारची सबसिडी डीलरला मिळते तर राज्य सरकारची सबसिडी ही ग्राहकांच्या खात्यात जाणार आहे. महाराष्ट्रात स्कूटरवर ही सबसिडी 25000 रुपयांपर्यंत मिळते. अशावेळी जर ओला बुक केली असेल  आणि जर ओला ईलेक्ट्रीक स्कूटरची किंमत 1.30 लाख रुपये असेल तर केंद्राची 39 हजार आणि राज्याची 25000 रुपये असे मिळून जवळपास 64000 रुपये वाचणार आहेत. म्हणजेच ओला ईलेक्ट्रीक स्कूटर 66000 रुपयांना मिळेल. (Ola electric scooter will get 66000 subsidy in Maharashtra.)

Web Title: Ola Electric scooter will get subsidy up to Rs 66,000 from central, Maharashtra government, see price...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.