ओलाचा गोला! स्कूटर त्याच, पण त्यांच्या बॅटऱ्या बदलल्या; पाच पर्याय, तुम्ही निवडा...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2023 07:54 PM2023-02-09T19:54:16+5:302023-02-09T19:54:33+5:30
काही दिवसांपूर्वी ओलाची दीड लाखाची स्कूटर पुढील चाकाजवळ मोडून पडली होती. ती चालविणारी महिला गंभीर जखमी झाली होती. तिचे तोंड रस्त्यावर आदळून चेहऱ्याची वाईट अवस्था झाली होती. अशात ओलाने स्कूटरमध्ये बदल केलेले नाहीत.
देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता ओलाने मोठ्या नामुष्कीनंतर ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे हतखंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. ओला इलेक्ट्रिकने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केले आहेत. परंतू, या त्याच स्कूटर आहेत ज्या आधीपासूनच्याच आहेत. फक्त त्यातील बॅटऱ्यांचे पर्याय देण्यात आले आहेत.
यामुळे ओलाला इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमतींशी खेळण्याची संधी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी ओलाची दीड लाखाची स्कूटर पुढील चाकाजवळ मोडून पडली होती. ती चालविणारी महिला गंभीर जखमी झाली होती. तिचे तोंड रस्त्यावर आदळून चेहऱ्याची वाईट अवस्था झाली होती. अशात ओलाने स्कूटरमध्ये बदल केलेले नाहीत. तर फक्त बॅटरी बदलल्या आहेत.
ओला एसवन Air चे तीन प्रकार आले आहेत आणि S1 आता दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होईल. एसवन एयरमध्ये फक्त बॅटरीची क्षमता कमी करण्यात आली आहे. मोटर 4.5 किलोवॅट इतकीच ठेवण्यात आली आहे. एअरच्या स्वस्त व्हेरिअंटमध्ये 2KWH बॅटरी देण्यात आली आहे. जी 85 किमीची रेंज देईल. तर 3KWH बॅटरी असलेली स्कूटर १२५ किमीची रेंज देणार आहे. 4KWH बॅटरी असलेली स्कूटर 165 किमीची रेंज देईल. तिन्ही स्कूटरचा टॉप स्पीड हा ८५ किमी प्रति तास असेल.
एस१ स्कूटर 2KWH बॅटरी 91 किमीची रेंज देईल. तीन KWH बॅटरी 141 किमीची रेंज देणार आहे. टॉप स्पीड हा अनुक्रमे ९० आणि ९५ किमी असेल.
ओलाने एस १ प्रोच्या किंमतीत बदल केला आहे. याची किंमत १०००० नी स्वस्त केली आहे. ती आता १.२९ लाखाला मिळणार आहे. या स्कूटरमध्ये चार किलोवॅटची बॅटरी मिळेल. 8.5 kW ची मोटर दिली जाणार आहे.