ओलाला डोलारा पेलवेना? कर्मचारी कपात, पगारवाढ रोखली; कंपन्याही बंद करू लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 02:53 PM2022-07-09T14:53:39+5:302022-07-09T14:54:01+5:30
एवढेच नाही तर ओलाने युज्ड कार सेल सह अन्य कंपन्याही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅब सर्व्हिस देणारी ओला कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. याचबरोबर कर्मचाऱ्यांना वर्षाच्या कामावरून दिले जाणारे अपरायझल देखील यंदा टाळले आहे. म्हणजेच जे कर्मचारी नोकरीवर ठेवायचे आहेत, त्यांना यंदा पगारवाढ मिळणार नाही. एवढेच नाही तर ओलाने युज्ड कार सेल सह अन्य कंपन्याही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यूज एजन्सी आयएएनएसने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. ओलाने जवळपास ५०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याची तयारी सुरु केली आहे. कंपनीकडे सध्या ११०० कर्मचारी आहेत. यापैकी निम्मे कर्मचारी काढून टाकण्यात येणार आहेत. कंपनीला निधी गोळा करण्यास समस्या येत आहेत.
ओलाला जगविख्यात सॉफ्टबँकचे फंडिंग मिळालेले आहे. परंतू, फायद्यात ठेवण्यासाठी ओला आपल्या टीम कमी करत आहे. कंपनीच्या एका अंतर्गत कम्युनिकेशनमध्ये एचआर चीफ बालाचंदर एन.ने लिहिले आहे, ते तुम्ही सर्व कर्मचारी पगारवाढीबाबत चिंतेत आहात. कंपनी गेल्या काही काळापासून आपले व्यवसाय पुनर्गठन करत आबे, तो एकदा का पूर्ण झाला की आपण पगारवाढीच्या प्रक्रियेवर चर्चा करू.
ओलाने आपले लक्ष इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटवर देण्याचे ठरविले आहे. यामुळे कंपनीने अन्य उद्योग बंद केले आहेत. गेल्याच महिन्यात कंपनीने युज्ड कारचा उद्योग बंद केला होता. महत्वाचे म्हणजे देशभरातील १०० शहरांत ३०० सेंटर खोलणार होती. याद्वारे १० हजार नोकऱ्या उपलब्ध करणार होती. याचबरोबर क्विक कॉमर्स बिझनेस Ola Dash देखील बंद करणार आहे. 2015 मध्ये Ola Cafes वर्षभरात बंद केले होते. यानंतर कंपनीने ओला फूड्स देखील सुरु केले होते, परंतू ते देखील म्हणावा तसा वेग पकडू शकला नाही.