Ola ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, इलेक्ट्रिक बाईकची सुद्धा एन्ट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 02:24 PM2023-08-15T14:24:14+5:302023-08-15T14:24:39+5:30
कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओस १ एक्स (Ola S1X) लाँच केली. ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
नवी दिल्ली : १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी ओला इलेक्ट्रिकने ग्राहक दिन २०२३ साजरा केला. या दरम्यान, कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ओला ओस १ एक्स (Ola S1X) लाँच केली. ही कंपनीची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आहे. याचबरोबर, कंपनीने एक बाईक सुद्धा आणली आहे. त्याकडे सर्वांच्या नजरा वळल्या होत्या. दरम्यान, कंपनीने एक नव्हे तर चार इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण केले. याशिवाय, कंपनीने सेकेंड जनरेशन प्लॅटफॉर्मवर तयार केलेला Ola S1 Pro देखील लाँच केली आहे.
ओलाचा दावा आहे की, ही भारतातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक आहे, जिचा वेग १२० किमी प्रतितास आहे. तर Ola S1 Pro च्या दोन नवीन कलर व्हेरिएंटने देखील एन्ट्री केली आहे. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी ओला कंपनीने इलेक्ट्रिक बाईकच्या रूपात सर्वात मोठी भेट दिली आहे. कंपनीने आज एकाच वेळी चार नवीन इलेक्ट्रिक बाईक्स सादर केल्या आहेत. यामध्ये ओला क्रूझर, ओला अॅडव्हेंचर, ओला रोडस्टर आणि ओला डायमंड हेड बाईक्सचा समावेश आहे.
All you thrill-seekers. Didn’t see that one coming, did you?🚀
— Ola Electric (@OlaElectric) August 15, 2023
Jaw-drop moment with the reveal of motorcycles 💎❤️
You excited? We are too. #OlaCustomerDay2023pic.twitter.com/k0k0EDhNk8
लॉन्च इव्हेंटमध्ये कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, कंपनी सेकंड जनरेशन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. ओला स्वतःहून इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी सेल बनवणार आहे. मात्र, पुढील वर्षीपासून सेलचे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरशिवाय कंपनीने नवीन ऑपरेटिंग सिस्टम MoveOS 4 देखील सादर केली आहे.
नवीन मॉडेलची किंमत
Ola S1 Pro च्या नवीन मॉडेलची एक्स-शोरूम किंमत १,४७,९९९ रुपये आहे. तर, Ola S1 X ची एक्स-शोरूम किंमत ८९,९९९ रुपयांपासून सुरू होते. ओला कंपनीने Ola S1 X ला तीन व्हेरिएंट Ola S1 X, Ola S1 X (2kWh) आणि Ola S1 X+ मध्ये लाँच केले आहे. व्हेरिएंटनुसार पुढीलप्रमाणे किंमत (एक्स-शोरूम ) पाहू शकता.
Ola S1 X+ : १,०९,९९९ रुपये
Ola S1 X : ९९,९९९ रुपये
Ola S1 X (2kWh): ८९,९९९ रुपये
कंपनीने आणली खास ऑफर!
ओलाच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे रिझर्व्हेशन आजपासून सुरू झाले आहे. तसेच, डिलिव्हरी सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. काही व्हेरिएंट डिसेंबरपासून मिळण्यास सुरुवात होईल. इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी कंपनीने खास ऑफर आणली आहे. या आठवड्यात तुम्ही ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी केल्यास, तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. या आठवड्यात इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्तात उपलब्ध होणार आहेत.