Ola Electric Scooter : ओलाच्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळतोय बंपर डिस्काउंट, जाणून घ्या किंमत....
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 04:44 PM2023-01-26T16:44:14+5:302023-01-26T16:44:43+5:30
Ola Electric Scooter : ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही स्वस्तात ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत मोठ्या झाली आहे. भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढली आहे. तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असाल किंवा खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दरम्यान, ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर आणली आहे. या ऑफरद्वारे तुम्ही स्वस्तात ओलाची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करू शकतात.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ओला कंपनीने प्रजासत्ताक दिनाची ऑफर सादर केली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्हाला बाजारात सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरपैकी एक असणारी ओला S1 Pro च्या खरेदीवर तब्बल 15 हजारांची सूट मिळणार आहे. दरम्यान, ही ऑफर 10,000 चा फ्लॅट डिस्काउंट आणि स्कूटरच्या खाकी कलर व्हेरिएंटवर 5,000 चा अतिरिक्त सवलतीच्या स्वरूपात उपलब्ध आहे.
किती तारखेपर्यंत ऑफर?
ओला एक्सचेंज ऑफरसह खरेदीदारांना 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते. ही ऑफर आज 26 जानेवारी ते 29 जानेवारीपर्यंत उपलब्ध असणार आहे.
ओलाने ट्विटद्वारे काय म्हटले?
ओला इलेक्ट्रिकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या ऑफरची घोषणा केली. "भारताच्या #1 EV वर स्विच करण्यासाठी कारण हवे आहे? या प्रजासत्ताक दिनी आम्ही तुम्हाला खूप काही देत आहोत! अविश्वसनीय ऑफरचा आनंद घ्या आणि बरेच काही", असे ओलाने ट्विटद्वारे म्हटले आहे.
Needed a reason to switch to India’s #1 EV? This Republic Day, we’re giving you many! Enjoy incredible offers and so much more. pic.twitter.com/v7k0F61eSk
— Ola Electric (@OlaElectric) January 25, 2023
कलर ऑप्शन
दरम्यान, ओला S1 Pro ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी 2021 मध्ये लाँच झाली होती. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.40 लाख रुपयांपासून सुरू होते. ही स्कूटर पोर्सिलेन व्हाइट, खाकी, निओ मिंट, कोरल ग्लॅम, जेट ब्लॅक, मार्शमॅलो, लिक्विड सिल्व्हर, मिलेनियल पिंक, अँथ्रासाइट ग्रे, मिडनाईट ब्लू आणि मॅट ब्लॅक यासह अनेक कलर ऑप्शनमध्ये आणली आहे.
स्पीड , रेंज आणि चार्जिंग टाईम?
ई-स्कूटर 170 किमी पर्यंत चांगली रेंज ऑफर करण्याचा दावा केला जातो. Ola S1 Pro 2.9 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेग वाढवेल असे म्हटले जाते. स्कूटर चार्ज होण्यासाठी 6.5 तास लागतात. यात इको, नॉर्मल, स्पोर्ट्स आणि हायपर ड्रायव्हिंग मोड आहेत.
15 मिनिटांच्या चार्जिंगसह 50 किमी रेंज
अलीकडेच कंपनीने ओला S1 Pro साठी MoveOS 3 अपडेट जारी केला आहे. ही स्कूटर OS हिल-असिस्ट, जलद चार्जिंग आणि अनेक नवीन फीचर्ससह येते. हे फक्त 15 मिनिटांच्या चार्जिंगसह 50 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. यामध्ये तुम्हाला पार्टी मोड आणि अनेक उत्तम फीचर्स पाहायला मिळतात.