Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:13 PM2022-08-16T13:13:45+5:302022-08-16T13:14:11+5:30

Ola S1 electric scooter launched : ओला S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल.

Ola S1 electric scooter launched at Rs 99,999 | Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू 

Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फक्त 499 रुपयांमध्ये बुकिंग सुरू 

googlenewsNext

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकने भारतात नवीन S1 ईव्ही लाँच केली आहे. या ईव्हीची एक्स-शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. नवीन ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखीच आहे. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट यादरम्यान 499 रुपयांमध्ये ईव्ही बुक केली जाऊ शकते. नवीन ओला S1 ची खरेदी 1 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होईल. बाजारात  Ather 450X, Simple One (विक्री अद्याप सुरू झालेली नाही), TVS iQube आणि Okinawa Okhi 90 सारख्या ईव्ही ओला S1 ची स्पर्धा असणार आहे.

नवीन ओला S1 मध्ये 2.98kWh बॅटरी पॅक असणार आहे. या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.  कंपनीचा दावा आहे की, नवीन ओला S1 फुल सिंगल चार्जवर 141 किमीची रेंज देऊ शकते. नवीन S1 मध्ये म्युझिक प्लेबॅक, नेव्हिगेशन, कंपेनियन अॅप आणि रिव्हर्स मोड यासारखी अनेक फीचर्स मिळतील. तसेच, S1 इलेक्ट्रिक स्कूटर S1 Pro सारखी दिसते, ज्याचे डिझाइन एलिमेंट बरेचसे समान आहेत. ही स्कटूर चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध केली जाईल. यामध्ये जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाइट आणि निओ मिंट असे कलर असतील.

ओला S1 लाँच करण्यासोबतच कंपनीने S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरसाठी नवीन 'खाकी' कलर स्कीम सुद्धा जाहीर केली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर 'खाकी' कलर स्कीम असणाऱ्या ओला S1 Pro च्या 1947 युनिट्सची निर्मिती केली जाईल. ओला S1 Pro 'खाकी' एडिशनची किंमत 1.49 लाख रुपये एक्स-शोरूम आहे.

ओलाची इलेक्ट्रिक कार
यासोबतच, ओला इलेक्ट्रिक आपली पहिली इलेक्ट्रिक कारही बाजारात आणणार आहे. ही कार 2024 मध्ये लॉन्च होणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सांगितले की, ही भारतात बनवलेली सर्वात स्पोर्टी दिसणारी कार असेल. ओलाची इलेक्ट्रिक कार 4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठू शकते आणि 500 ​​किमी पेक्षा जास्त रेंज देईल. नवीन ओला इलेक्ट्रिक कारमध्ये असिस्टेड ड्राइव्ह टेक्नॉलॉजी, कीलेस ऑपरेशन आणि ओलाचे मूव्ह ओएस हे फीचर्स असतील, असा दावा अग्रवाल यांनी केला आहे.

Web Title: Ola S1 electric scooter launched at Rs 99,999

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.