ओला, बजाजची विकेट गेली! एथरने लाँच केली 56 लीटर बुटस्पेस, 160 किमीची रेंज देणारी भली मोठी स्कूटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 14:42 IST2024-04-06T14:41:47+5:302024-04-06T14:42:33+5:30
Ather Energy Rizta Launch: देशातील सर्वात पहिली यशस्वी झालेली इलेक्ट्रीक टू व्हीलर कंपनी Ather Energy ने पहिली फॅमिली स्कूटर लाँच केली आहे.

ओला, बजाजची विकेट गेली! एथरने लाँच केली 56 लीटर बुटस्पेस, 160 किमीची रेंज देणारी भली मोठी स्कूटर
देशातील सर्वात पहिली यशस्वी झालेली इलेक्ट्रीक टू व्हीलर कंपनी Ather Energy ने पहिली फॅमिली स्कूटर लाँच केली आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर भारतीय कुटुंबाच्या गरजांना विचारात घेऊन बनविण्यात आली आहे. आधीच्या कंपनीच्या स्कूटरमधील ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बुट स्पेस, बसण्याची मोठी सीट आणि अन्य फिचर्सही भरभरून देण्यात आल्या आहेत.
कंपनीने रिझ्टामध्ये ५६ लीटरची बुट स्पेस दिली आहे. तसेच सीटवर नवरा-बायको आणि मुल असे तिघेजण आरामात बसू शकतील एवढी लांबी दिली आहे. या स्कूटरची किंमतही कंपनीने 1,09,999 रुपयांपासून सुरु केली आहे. फक्त एक महत्वाचा बदल म्हणजे कंपनीने या स्कूटरमध्ये हब मोटर दिली आहे. तसेच टचस्क्रीन ऐवजी जॉय स्टीक दिली आहे. या द्वारे स्क्रीनवरील गोष्टी हाताळता येणार आहेत.
Rizta चे कंपनीने दोन व्हेरिअंट आणले आहेत. यामध्ये एस आणि झेड असे बॅटरी पॅकनुसार तुम्हाला निवडता येणार आहेत. Rizta S मध्ये 2.9 kWh छोटी बॅटरी पॅक आहे. 121 किमीची आयडीसी तर १०५ किमीची ट्रू रेंज देत असल्याचा दावा केला आहे. Rizta Z मध्ये 3.7 kWh ची बॅटरी पॅक देण्यात आली आहे. हे व्हेरिअंट 160 किमी (125 किमी ट्रू रेंज) देते. IP67 रेटिंग चे बॅटरी पॅक आहे.
Rizta S मध्ये ७ इंचाचा नॉन-टच डीपव्यू डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. तर झेड व्हेरिअंटरमध्ये टचस्क्रीन देण्यात आली आहे. पुढे टेलिस्कोपिक फोर्क, १२ इंचाचे अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आदी देण्यात आले आहेत. अर्जंट ब्रेक मारला तर जास्त वेळा ब्लिंक करून मागच्याला सावध करणारी ब्रेक लाईट, होल्ड असिस्ट, पडल्यानंतर उचलताना अॅक्सिलेटर न्युट्रल आदी गोष्टी सुरक्षेसाठी देण्यात आल्या आहेत. तसेच लोकेशन शेअरिंगही देण्यात आले आहे.
(लवकरच बजाज चेतक २०२४ मॉडेलचा आम्ही रिव्हू, ओनरशिप एक्सपिरिअन्स वाचकांसोबत शेअर करणार आहोत. स्टे ट्यून्ड...)