Ola S1 Pro Recall: आता ओलाला सुचले! समस्यांवर समस्या, पुण्यात आग लागताच 1441 स्कूटर रिकॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 06:10 PM2022-04-25T18:10:12+5:302022-04-25T18:10:34+5:30
ओलाने २६ मार्चला पुण्यात स्कूटरला लागलेली आग ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे ओलाने म्हटले आहे.
ओलाने गेल्या वर्षी ईलेक्ट्रीक स्कूटर लाँच करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता जेवढा प्रतिसाद त्यापेक्षा जास्त शिव्या या कंपनीला पडू लागल्या होत्या. एकेक ग्राहकाला तीन चारदा गाड्यांध्ये फिट अँट फिनिश किंवा अन्य समस्यांमुळे स्कूटर टो करून कंपनीकडे पाठवाव्या लागल्या होत्या. गेल्या महिन्यात तर या स्कूटरला पुण्यात आग लागली होती. परंतू आता कुठे ओलाने यावन निर्णय घेतला आहे.
गेल्याच आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी इलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागत असल्याचा पार्श्वभूमीवर कंपन्यांना झापले होते. यानंतर ओलाने हा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वीच ओकिनावाने आपल्या तीन हजाराच्या वर स्कूटर माघारी बोलविल्या होत्या. बॅटरी सदोष असल्याने या आगी लागत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ओलाने २६ मार्चला पुण्यात स्कूटरला लागलेली आग ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे ओलाने म्हटले आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी आमचे अभियंते या स्कूटरची कसून तपासणी करतील. बॅटरी सिस्टम आधीपासूनच नियमांनुसार तयार केली गेली आहे, असेही म्हटले आहे.