Ola S1 Pro: ओला इलेक्ट्रीक स्कूटर १४ दिवसांत डिलिव्हर करू; कंपनी नवा शब्द पाळणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 01:18 PM2022-05-31T13:18:23+5:302022-05-31T13:18:40+5:30
गेल्या वर्षभरात ओलाच्या स्कूटरने जेवढी प्रसिद्धी कमावली तेवढीच गमावलीसुद्धा आहे. ओलाच्या स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळाला होता, परंतू ग्राहकांना डिलिव्हरी काही होता होत नव्हती. त्यात समस्या एवढ्या की ग्राहक वैतागले, आणि पुढचे सावध झाले.
ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला मोठी मागणी होती. तेव्हा कंपनी काही ही मागणी वेळेत पूर्ण करू शकली नाही. कारणे काहीही असोत परंतू कंपनीने अनेकांना सदोष स्कूटर दिल्या. यामुळे जे घेणारे ग्राहक होते, त्यांनी देखील पाठ फिरविली आहे. या समस्या दूर केल्याचा दावा करत असतानाचा कंपनीसमोर गंभीर समस्या उभी ठाकली आहे.
ओलाची स्कूटर पुढील चाकातूनच भर रस्त्यात मोडून पडत आहे. यामुळे स्कूटर चालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आता कंपनीने Ola S1 Pro ही १४ दिवसांत डिलिव्हर करण्याचा दावा केला आहे. परंतू यातही कंपनीने काही स्पष्ट केलेले नाही. बुकिंग केल्यावर १४ दिवसांत डिलिव्हरी की गाडी कंपनीतून निघाल्यावर १४ दिवसांत डिलिव्हरी मिळेल हे स्पष्ट केलेले नाही. अनेकांना तर आरटीओ रजिस्ट्रेशनचा मेसेज येऊनही १५ दिवस ते महिनाभर स्कूटर घरी न आल्याचा अनुभव आहे.
Ola Scooter: आधी आगीची घटना, आता झाले दोन तुकडे; Ola Scooter बाबत ग्राहकांचा संताप
कंपनीने १४ दिवसांत डिलिव्हरी करण्याचा काही ग्राहकांना मेसेज केला आहे. या ईमेलमध्ये Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरच्या 14 दिवसांच्या गॅरंटीड डिलिव्हरीबद्दल सांगण्यात आले आहे. मात्र, हे 14 दिवस कधीपासून मोजले जाणार हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. गेल्या आठवड्यातच कंपनीने बुकिंग विंडो सुरु केली होती.
Ola S1 Pro Scooter Problems List: एक दोन नाहीत, ओला एस१ प्रोमध्ये २५ प्रॉब्लेम्स; ग्राहक सांगून सांगून वैतागले
गेल्या वर्षभरात ओलाच्या स्कूटरने जेवढी प्रसिद्धी कमावली तेवढीच गमावलीसुद्धा आहे. ओलाच्या स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळाला होता, परंतू ग्राहकांना डिलिव्हरी काही होता होत नव्हती. आज देतो, उद्या देतो असे म्हणत अखेर कंपनीने डिसेंबर, जानेवारीला मोजक्या ग्राहकांना स्कूटर देण्यास सुरुवात केली आणि याच मोजक्या ग्राहकांनी ओलाच्या या हायफाय स्कूटरची पिसे काढली. जगातील सर्वात मोठी मागणी नोंदविलेल्या या स्कूटरमध्ये एवढ्या समस्या आल्या की ग्राहक सोशल मीडियावर तक्रारी करू लागले. कोणाची स्कूटर आल्या आल्याच बंद पडली, कोणाची सुस्साट मागे धावू लागली, कंपनीने सांगितलेली रेंज कोणालाही मिळाली नाही.