लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 02:08 PM2021-12-16T14:08:42+5:302021-12-16T14:10:01+5:30

Ola Electric Scooter : ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro ची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 

Ola S1, S1 Pro Electric Scooter delivers first 100 scooters without some promised features | लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार!

लाँचिंगच्या 4 महिन्यांनंतर Ola Scooter ची डिलिव्हरी, पुन्हा खरेदी विंडो उघडणार!

googlenewsNext

नवी दिल्ली : ओला स्कूटरची ( Ola Scooter) डिलिव्हरी सुरू झाली आहे. ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनीने स्कूटरचे पहिले युनिट लाँच झाल्यानंतर अवघ्या 4 महिन्यांत डिलिव्हरी केली आहे. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 आणि Ola S1 Pro ची डिलिव्हरी 15 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. 

याआधी, कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal Tweet) यांनी ट्विट करून या महिन्यापासून डिलिव्हरी सुरू करण्याची माहिती दिली होती. दरम्यान, ओला स्कूटरच्या पहिल्या 100  ग्राहकांना डिलिव्हरी करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने बंगळुरू आणि चेन्नई येथे एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता.

ओला इलेक्ट्रिकने 15 ऑगस्ट 2021 रोजी Ola S1 आणि Ola S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटर्स लाँच केल्या. यासोबतच या स्कूटरची बुकिंग सुरू झाली आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये या स्कूटरच्या खरेदीची विंडो उघडण्यात आली. त्यानंतर 10 नोव्हेंबरपासून देशातील विविध शहरांमध्ये स्कूटरची टेस्ट राइड सुरू करण्यात आली. अखेरीस, 15 डिसेंबर रोजी म्हणजेच लाँचिगच्या बरोबर 4 महिन्यांनंतर, लोकांना पहिल्या ओला स्कूटरची डिलिव्हरी मिळाली.

पुन्हा खरेदी विंडो उघडली जाणार 
ईटीने कंपनीचे चीफ मार्केटिंग ऑफिसर वरुण दुबे यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, ओला स्कूटरची पुढील खरेदी विंडो लवकरच उघडली जाणार आहे. ते म्हणाले की, कंपनीने ओला स्कूटरचे 499 रुपयांचे बुकिंग कधीच थांबवले नाही. या बुकिंगमुळे लोक ओला स्कूटर खरेदी करू शकतात. आता पुढील खरेदीची विंडो जानेवारी 2022 महिन्याच्या अखेपर्यंत उघडली जाईल.

स्कूटर्सची किंमत?
ओला इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 व्हेरिएंटची किंमत 1 लाख रुपये आहे, तर S1 Pro व्हेरिएंटची किंमत 1. 30 लाख रुपये आहे. ही किंमत एक्स-शोरूम आणि राज्य सबसिडीपूर्वीची आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत देखील देशातील विविध राज्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठी देण्यात येणाऱ्या सबसिडीनुसार बदलू शकते.

ड्रायव्हिंग रेंज आणि स्पीड
Ola S1 व्हेरिएंट एकदा फुल चार्ज केल्यानंतर 121 किमी अंतर कापू शकते. तर S1 Pro प्रकार एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 181 किमी पर्यंतचे अंतर कापू शकते. S1 व्हेरिएंट 3.6 सेकंदात 0 ते 40 किमी प्रतितास वेगाने धावते, तर S1 Pro व्हेरिएंट 3 सेकंदात 0 ते 40 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडू शकते. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड 115 किमी प्रतितास आहे.

फीचर्स
S1 आणि S1 Pro दोन्ही मॉडेल्स अनेक फीचर्ससह येतात. स्कूटर बिना चावी असून मोबाइल फोन अॅप वापरून सुरू करता येते. यामध्ये मल्टी ड्रायव्हर प्रोफाइल तयार करता येतात. भविष्यात, कंपनी अॅप अपडेटद्वारे पॅरेंटल कंट्रोल आणि जिओफेन्सिंग यांसारखी अनेक फीचर्स वाढवू शकते. या स्कूटरमध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर उपलब्ध आहेत, म्हणजेच तुम्ही पोहोचताच स्कूटर अनलॉक होईल. ओला स्कूटरचे बूट उघडणे आणि बंद करण्याच्या ऑप्शनसह जीपीएस आणि कनेक्टिव्हिटीची सुविधा सुद्धा देण्यात आली आहे.

18 मिनिटांत 50 टक्के चार्जिंग
ओला इलेक्ट्रिकचे हायपरचार्जर ई-स्कूटरची बॅटरी केवळ 18 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करते. यामुळे स्कूटरची बॅटरी 75 किमीच्या अर्ध्या सायकलची रेंज कव्हर करण्यासाठी पुरेशी चार्ज होईल. कंपनीच्या वेबसाइटमध्ये ज्या शहरांमध्ये चार्जर स्टेशन लावण्यात येणार आहेत, त्याची संपूर्ण यादी देण्यात आली आहे.

Web Title: Ola S1, S1 Pro Electric Scooter delivers first 100 scooters without some promised features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.