ओला स्कूटरची विक्री ३० टक्क्यांनी घसरली; TVS iCube च्या जवळ येऊन ठेपली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:50 AM2024-12-02T08:50:49+5:302024-12-02T08:51:08+5:30
Ola Electric Sale Down: कोणी शोरुम जाळले जर कोणी आपली स्कूटरच जाळली आहे. नुकताच स्कूटर घेऊन महिना नाही झाला तर ९०००० रुपयांचे दुरुस्तीचे बिल ओलाने दिल्याने एका ग्राहकाने ओला सर्व्हिस सेंटरबाहेर स्कूटर फोडली आहे. या सर्वाच फटका ओलाच्या शेअरवर तसेच विक्रीवर जाणवायला सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून डिस्काऊंटवर डिस्काऊंट देत फॉल्टी स्कूटर विकणाऱ्या ओलाचे दिवस बदलू लागल्याचे संकेत मिळू लागले आहेत. ओलाने हायफाय फिचर्स देत, फसव्या जाहिराती करत, भरमसाठ डिस्काऊंट देत स्कूटरची विक्री केली होती. परंतू, या स्कूटरमधील समस्यांनी आणि त्या दुरुस्त करण्यात ओलाला अपयश येत असल्याने किंवा महिना, दोन महिन्यांचा काळ लावत असल्याने आता ग्राहकांनी या स्कूटरक़डे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे.
ओलाच्या ग्राहकांच्या तक्रारींवर कंपनीला केंद्र सरकारच्या संस्थांनी नोटीसही पाठविल्या आहेत. अशातच वैतागलेल्या अनेक ग्राहकांनी ओलाचे शोरुम बंद पाडले आहेत. अनेक ठिकाणी कंपनीनेच शोरुम बंद केले आहेत. कोणी शोरुम जाळले जर कोणी आपली स्कूटरच जाळली आहे. नुकताच स्कूटर घेऊन महिना नाही झाला तर ९०००० रुपयांचे दुरुस्तीचे बिल ओलाने दिल्याने एका ग्राहकाने ओला सर्व्हिस सेंटरबाहेर स्कूटर फोडली आहे. या सर्वाच फटका ओलाच्या शेअरवर तसेच विक्रीवर जाणवायला सुरुवात झाली आहे.
नोव्हेंबर महिन्यात ओला स्कूटरची विक्री मोठ्या आकड्याने घसरली आहे. उत्सव काळात सुरु केलेली बॉस ऑफर आजही कंपनीने सुरुच ठेवली आहे. तरीही नोव्हेंबरमध्ये कंपनीच्या विक्रीत ३० टक्क्यांची घसरण झाली आहे. ऑक्टोबरमद्ये ४०००० हून अधिक स्कूटर कंपनीने विकल्या होत्या. नोव्हेंबरला ही विक्री २७७४६ वर आली आहे. याचबरोबर कंपनीचे बाजारातील अस्तित्व ३० टक्क्यांवरून थेट २४ टक्क्यांवर आले आहे.
नोव्हेंबरमध्ये टीव्हीएस, बजाज चेतकच्या विक्रीतही घट झाली असून ती १८ टक्के एवढी आहे. काही महिन्यांत होंडाची अॅक्टिव्हा येत आहे. यामुळे या तिन्ही कंपन्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. सर्व्हिसमध्ये टीव्हीएस आणि चेतक तग धरतील परंतू ओलाने सर्व्हिस सुधारली नाही तर दोन वर्षांत इलेक्ट्रीक बुममुळे चढलेला ग्राफ कधी घसरायला लागेल, हे सांगता येणार नाही अशी स्थिती सध्या ओलाची होणार आहे.
TVS ने 26,036 EV दुचाकींची नोंदणी केली आहे जी गेल्या महिन्याच्या तुलनेत 13 टक्के कमी आहे. बजाज ऑटोने 24,978 वाहनांची नोंदणी केली, जी 12% ची मासिक घट झाली आहे. एथर एनर्जीच्या विक्रीतही 24 टक्क्यांनी घट झाली आणि केवळ 12,217 युनिट्सची नोंदणी झाली आहे.