Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 04:29 PM2023-05-03T16:29:40+5:302023-05-03T16:30:16+5:30

ओलाने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे.

ola sold 30000 electric scooter in april highest ev sales in a single month | Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली

Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehilce) वाहनांची मागणी प्रचंड वाढली आहे. दिग्गज कंपन्यांपासून ते स्टार्टअपपर्यंत अनेक ब्रँड्स बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर विकत असले तरी, ओला (Ola) इलेक्ट्रिकने निर्माण केलेली लोकप्रियता ही सर्वात जास्त आहे. कॅब सेवेनंतर अलीकडेच इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये दाखल झालेल्या ओला इलेक्ट्रिकने एप्रिल महिन्यात 30,000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. यासह, ही देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक दुचाकी विक्री करणारी कंपनी बनली आहे.

ओलाने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे. त्यानुसार, कंपनीने एका महिन्यात तब्बल 30 हजार इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री केली आहे. सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या जाणाऱ्या कंपनीच्या यादीत ओलाने सलग आठव्यांदा पहिले स्थान मिळवले आहे. तसेच, इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमधील कंपनीची भागीदारी 40 टक्क्यांवर पोहोचल्याचा कंपनीचा दावा आहे. याचा अर्थ टीव्हीएस, एथर एनर्जी, हिरो, बजाज, ओकिनावा आणि इतर ब्रँडच्या स्कूटर यांची एकूण भागीदारी 60 टक्के आहे. 

याचबरोबर, ओलाने विक्रीत 30 हजारांचा आकडा पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मार्च महिन्यात कंपनीने 17 हजार युनिट्सची विक्री केली होती. म्हणजेच कंपनी महिन्याला 10 टक्के जास्त विक्री करत आहे. तसेच, ओला देशभरात आपले एक्सीपिरियन्स सेंटर्स वाढवत आहे. कंपनीचा दावा आहे की, ओलाचे 90 टक्के ग्राहक हे एक्सीपिरियन्स सेंटर्सच्या 20 किमी परिसरात राहणारे आहेत. 

ओला इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज?
ओलाने इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये S1 Air, S1 आणि S1 Pro चा समावेश आहे. कंपनी ने बेस मॉडेल S1 Air ची किंमत 84,999 रुपये ठेवली आहे. ही स्कूटर 101 किमीची रेंज देते. तर S1 मॉडेलसाठी 99,999 रुपये मोजावे लागत आहेत. या स्कूटरची रेंज 128 किमी आहे. याशिवाय, S1 Pro ची किंमत 1,24,999 रुपये (एक्स-शोरूम) असून 170  ची रेंज देते. दरम्यान, स्कूटरची ARAI सर्टिफाइड रेंज जास्त आहे, परंतु कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सुद्धा या स्कूटरच्या वास्तविक रेंजबद्दल माहिती दिली आहे.

Web Title: ola sold 30000 electric scooter in april highest ev sales in a single month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.