Ola Electric Car: मोठा डाव खेळली! ओलाची नवी इलेक्ट्रीक कार आणि महिंद्रा थारमध्ये थेट कनेक्शन; एकच डिझायनर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2022 06:26 PM2022-05-04T18:26:55+5:302022-05-04T18:29:11+5:30
Ola's new electric car designer: ओलाच्या स्कूटरचे एकेक प्रताप पाहता कंपनीला आता लाथाबुक्क्याच मिळणे बाकी राहिल्याचे चित्र आहे. अशाही वातावरणात ओलाने आता पुन्हा एकदा ईलेक्ट्रीक कारची हवा करण्यास सुरुवात केली आहे.
इलेक्ट्रीक स्कूटर ओला एस१ प्रो लाँच करून लोकांचे शिव्याशाप खात असलेली कंपनी ओला इलेक्ट्रीक आता ईव्ही कार आणणार आहे. ओला इलेक्ट्रीक स्कूटरच्या प्रसिद्धीच्या झोतात याची घोषणा करण्यात आली होती. परंतू, ओलाच्या स्कूटरचे एकेक प्रताप पाहता कंपनीला आता लाथाबुक्क्याच मिळणे बाकी राहिल्याचे चित्र आहे.
अशाही वातावरणात ओलाने आता पुन्हा एकदा ईलेक्ट्रीक कारची हवा करण्यास सुरुवात केली आहे. Ola Electric Car डिझाईन करणारी ही एक महिला असणार आहे. याच महिलेने महिंद्राची सर्वात प्रसिद्ध कार महिंद्रा थार आणि नुकतीच लाँच झालेली Mahindra XUV700 यासारख्या कार डिझाईन केल्या आहेत.
ओला कंपनीने रामकृपा अनंतनच्या क्रक्स स्टुडिओला डिझाइन सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ही कंपनी ओलाच्या इलेक्ट्रिक कारचे डिझाईन तयार करणार आहे. पुढील आर्थिक वर्षात ही कार लॉन्च होऊ शकते. रामकृपा अनंतन या महिंद्रा अँड महिंद्राचे डिझाईन प्रमुख होत्या. आगामी महिंद्राच्या वाहनांचे मूळ डिझाइनही रामकृपा अनंतनच्या टीमने तयार केले आहेत.
आता महिंद्रा अँड महिंद्राचे डिझाईन हेड प्रताप बोस आहेत, जे आधी टाटा मोटर्समध्ये होते. महिंद्राचा नवीन लोगो डिझाइन करण्याचे श्रेय प्रताप बोस यांना जाते. रामकृपा अनंतन यांनी आयआयटी-बॉम्बेच्या इंडस्ट्रियल डिझाइन सेंटरमधून ग्रॅज्युएशन केले आहे. त्यांनी TUV 300, XUV 500, KUV 100, Marazzo या गाड्यांचे डिझाईन बनविले आहे. तर Bolero आणि Scorpio च्या टीममध्ये त्या काम करत होत्या.