बाबो...! 150 किमींचा अजस्त्र 'डोलारा'; चीनची सर्वात मोठी SUV कंपनी भारतात धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:34 AM2020-01-03T11:34:36+5:302020-01-03T12:40:34+5:30
2019 हे वर्ष भारतीय वाहन उद्योगासाठी मंदीचेच राहिले होते. मात्र, याच वर्षी आलेल्या एमजी मोटर्स आणि किया मोटर्सने ही मंदीच मोडून काढली आहे. पुढील काळात आणखी दोन चीनी कंपन्या भारतात त्यांच्या कारचा ताफाच लाँच करणार आहेत.
नवीन वर्षाच्या सुरवातीलाच भारतीय वाहनप्रेमींसाठी खूशखबर आहे. यंदा दोन नव्या कंपन्या भारतीय बाजारात उतरणार आहेत. महत्वाचे म्हणजे दोन्ही कंपन्या चीनच्याच आहेत. First Automobile Works (FAW) या मोठ्या कंपनीची Haima Automobile ही उपकंपनी भारतातील ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवणार आहे. तर Great Wall Motors नेही काल भारतीय बाजारपेठेत येण्याचे संकेत दिले आहेत.
2019 हे वर्ष भारतीय वाहन उद्योगासाठी मंदीचेच राहिले होते. मात्र, याच वर्षी आलेल्या एमजी मोटर्स आणि किया मोटर्सने ही मंदीच मोडून काढली आहे. पुढील काळात आणखी दोन चीनी कंपन्या भारतात त्यांच्या कारचा ताफाच लाँच करणार आहेत. हाईमा कंपनी केंद्रासह राज्य सरकारांसोबत चर्चा करत आहे. ही कंपनी 1988 मध्ये स्थापन झाली होती. या कंपनीच्या ताफ्यात Aishang 360 हॅचबॅक, E3 मिडसाइज सेदान, E5 SUV आणि E7 MPV गाड्या आहेत.
तर ग्रेट वॉल मोटर्स ही चीनची सर्वात मोठी एसयुव्ही निर्माता कंपनी आहे. तिचे चार ब्रँड असून हवाल, वे, ओरा आणि ग्रेट वॉल पिकअप अशी त्यांची नावे आहेत. यापैकी Haval, Wey हे कंपनीचे एसयुव्हीसाठीचे ब्रँड आहेत. तर Ora हा इलेक्ट्रीक कारचा ब्रँड आहे. ही कंपनी भारतातील पहिली कार ऑटो एक्स्पोवेळी लाँच करू शकते. ही कंपनी त्यांचा सर्वाधिक यशस्वी ब्रँड Haval भारतात आणण्याची शक्यता आहे. याद्वारे कंपनी H4, H6 आणि H9 या तीन एसयुव्ही लाँच करण्याची शक्यता आहे. तर इलेक्ट्रीक वाहनांमध्ये ओरा आणि वे या ब्रँडच्या दोन कार लाँच करण्याची शक्यता आहे.
चीनची ही कंपनी बाओडिंग हेबेईमध्ये जवळपास 150 किमी क्षेत्रावर पसरलेली आहे. यावरून या कंपनीच्या आवाक्याचा विचार करता येईल. सध्या ही कंपनी भारतात फॅक्टरीसाठी जागा शोधत आहे. नुकतेच या कंपनीने ट्विटरवर नमस्ते इंडिया, कमिंग सून असे लिहिल्याने भारतातील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे.
Namaste India! All set for great things ahead… #GWMinIndiapic.twitter.com/ljvqprRvD2
— GWMIndia (@GwmIndia) January 1, 2020
या तीन गाड्या असतील...
कंपनी 2021 च्या मध्याला Haval H4 भारतात लाँच करू शकते. ही कार ह्युंदाईच्या क्रेटाला टक्कर देणार आहे. मात्र ही कार क्रेटापेक्षा मोठी असणार आहे. तर चीनमध्ये सर्वाधिक खप असलेली SUV H6 देखिल लाँच केली जाणार आहे. तसेच 4.8 मीटर लांबीची H9 ही एसयुव्हीही लाँच केली जाणार आहे. ही एसयुव्ही फोर्ड एन्डोव्हर, फॉर्च्युनरला टक्कर देणार आहे.