Video: भन्नाट...! 280 च्या वेगाने चालवली सायकल; वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 05:51 PM2019-08-20T17:51:36+5:302019-08-20T17:52:11+5:30
इंग्लंडच्या 45 वर्षांचा सायकलपटू नील कॅम्पबेल याने हा विक्रम केला आहे.
सायकल किती वेगाने धावू शकते? 20, 30, 50, 100 किमी प्रती तास...तुमचा विश्वास बसणार नाही, पण एका व्यक्तीने तब्बल 280 किमी प्रतीतास एवढ्या प्रचंड वेगाने सायकल चालवून वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.
इंग्लंडच्या 45 वर्षांचा सायकलपटू नील कॅम्पबेल याने हा विक्रम केला आहे. नीलने 24 वर्षांपूर्वीचे डच सायकलपटूचे रेकॉर्ड तोडले आहे. हे रेकॉर्ड बनविण्यासाठी नीलली महागड्या पोर्श्च कारसोबत पाठविण्यात आले होते. ही रेस नॉर्थ यॉर्कशायरच्या एलविंग्टन एयरफील्डवर घेण्यात आली होती.
या रेसचा व्हिडीओही सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात आला आहे. नीलने जी सायक वापरली होती, ती खास एवढ्या वेगासाठी तयार करण्यात आली होती. यासाठी 15 लाखांचा खर्च आला होता.
वर्ल्ड रेकॉर्ड बनविल्यानंतर नीलने सांगितले की, आता मला स्वस्थ वाटू लागले आहे. आमच्या टीमने आश्चर्यकारकरित्या चांगली कामगिरी केली आहे.
A British daredevil has become the fastest man in the world on a bike. Architect by day, Neil Campbell was pulled along by a porshe on his custom built bike before being released and hurtling down a runway at 174 miles per hour. pic.twitter.com/E0i4Nudtmk
— Channel 5 News (@5_News) August 18, 2019
1995 मध्ये नेदरलँडच्या सायकलपटूने 268.76 किमीच्या वेगाने सायकल चालविली होती. हे रेकॉर्ड नीलने तोडले आहे.