Land Rover च्या गाड्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी; कमी किंमतीत मिळेल संपूर्ण स्वॅग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 06:00 PM2022-07-26T18:00:45+5:302022-07-26T18:01:41+5:30

Land Rover Used Cars At Low Price : या गाड्या आम्ही लँड रोव्हरच्या आधिकृत वेबसाइटवरही पाहिल्या आहेत. येथे लँड रोव्हरकडूनच त्यांच्या जुन्या गाड्यादेखील विकल्या जातात. 

Opportunity to buy Land Rover cars cheaply; Get complete swag for less money | Land Rover च्या गाड्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी; कमी किंमतीत मिळेल संपूर्ण स्वॅग

Land Rover च्या गाड्या स्वस्तात खरेदी करण्याची संधी; कमी किंमतीत मिळेल संपूर्ण स्वॅग

Next

लँड रोव्हरकार अत्यंत महागड्या आणि लक्झरीअस असतात. ही गाडी विकत घ्यावी, असे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, किंमत फार अधिक असल्याने सर्वच लोक त्या खरेदी करू शकत नाहीत. यामुळे आज आम्ही आपल्यासाठी, लँड रोव्हरच्या काही खास जुन्या गाड्यांची माहिती घेऊन आलो आहोत. या गाड्या आम्ही लँड रोव्हरच्या आधिकृत वेबसाइटवरही पाहिल्या आहेत. येथे लँड रोव्हरकडूनच त्यांच्या जुन्या गाड्यादेखील विकल्या जातात. 

लँड रोव्हरच्या आधिकृत वेबसाइटवर LAND ROVER DISCOVERY SPORT HSE साठी 4600000 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. हे 2019 चे मॉडल असून 13214 किलोमीटर चालेल आहे. ही बायरन ब्लू कलरमध्ये  उपलब्ध आहे. यात पेट्रोल इंजिन आहे. ही एसयूव्ही विक्रीसाठी मुंबईत उपलब्ध आहे.

याशिवाय, LAND ROVER DISCOVERY SPORT HSE LUXURY साठी 4400000 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. हे 2016 चे मॉडेल आहे आणि ही कार एकूण 34267 किलोमीटर धावली आहे. ही फायररेंज रेड कलर मध्ये आहे. ही डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध आहे. ही एसयूव्ही देखील मुंबईमध्ये विक्रीसाठी उपलपब्ध आहे.

LAND ROVER DISCOVERY SPORT HSE LUXURY साठी 4700000 रुपये एवढी किंमत ठेवण्यात आली आहे. हे  2018 चे मॉडेल असून ही कार एकूण 28050 किलोमीटर चालली आहे. यह बायरन ब्लू कलरमध्ये उपलब्ध आहे. ही एसयूव्ही डिझेल इंजिनमध्ये उपलब्ध असून गुरुग्राममध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.
 

Web Title: Opportunity to buy Land Rover cars cheaply; Get complete swag for less money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.