15 दिवसांतच Skoda Kushaq मध्ये सापडले 4 प्रॉब्लेम; पुण्यातील मालक वैतागला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 01:49 PM2021-08-10T13:49:08+5:302021-08-10T13:50:39+5:30

Skoda Kushaq च्या ग्राहकांना कंपनीच्या कॉस्ट कटिंगचा फटका बसलेला आहे. कारची किंमत मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉनच्या तुलनेत ठेवायची असल्याने स्कोडाने त्याकडे लक्ष दिले आहे.

Owner of 15 Days Old Skoda Kushaq Lists Out 4 Problems, Gear shifting, Plastic noise | 15 दिवसांतच Skoda Kushaq मध्ये सापडले 4 प्रॉब्लेम; पुण्यातील मालक वैतागला

15 दिवसांतच Skoda Kushaq मध्ये सापडले 4 प्रॉब्लेम; पुण्यातील मालक वैतागला

googlenewsNext

स्कोडा कंपनीसाठी Skoda Kushaq संजिवनी ठरण्याची शक्यता आहे. जून महिन्यात कंपनीने ही एसयुव्ही लाँच केली होती. लाँच नंतरच एका महिन्याच्या आतच या एसयूव्हीमुळे कंपनीच्या विक्रीत 234 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मात्र, कार घेतल्याच्या 14 दिवसांतच एका कार मालकाने या एसयुव्हीमधून समस्यांची यादी काढली आहे. (4 problems found in Skoda Kushaq in 15 days; The owner of Pune was annoyed)

नव्या Hero Electric Scooter चे फोटो लीक; ओला, बजाज चेतकला देणार टक्कर

संतोष नावाच्या या ग्राहकाने Skoda Kushaq Active मॉडेल घेतले आहे. यामध्ये त्याला 4 प्रॉब्लेम सापडले आहेत. यामध्ये हार्ड क्लच, गिअर शिफ्टींग स्मूथ नाही, को-ड्रायव्हर सीट शेकिंग- व्हायब्रेटिंग आणि चौथा साऊंड सिस्टीम सुरु असताना दरवाजाच्या प्लॅस्टीकमधून आवाज येणे या सुरुवातीच्या समस्या आहेत. हा मालक पुण्याचा असून त्याने 20 जुलैला ही कार ताब्यात घेतली होती. 

Video: आनंद महिंद्रांचा मोठा निर्णय! कंपनीची वर्षानुवर्षाची ओळख 'पुसणार'; लोगो बदलणार

Skoda Kushaq च्या ग्राहकांना कंपनीच्या कॉस्ट कटिंगचा फटका बसलेला आहे. कारची किंमत मारुती ब्रेझा, टाटा नेक्सॉनच्या तुलनेत ठेवायची असल्याने स्कोडाने त्याकडे लक्ष दिले आहे. यामुळे सीट व्हायब्रेटिंग आणि म्युझिकचा आवाज वाढविला की दरवाजाचे प्लॅस्टिक कर-कर वाजणे ही समस्या उद्भवली आहे. महत्वाचे म्हणजे सीट व्हायब्रेट होणे बंद होईल परंतू दरवाजातील आवाज हा येतच राहणार आहे. 

Ola Electric Scooter वर मिळेल 50,000 रुपयांपेक्षा जास्त सबसिडी; जाणून घ्या कसा होईल फायदा...

स्कोडा कुशकची किंमत कंपनीने 10.49-17.59 lakh एक्स शोरूम ठेवलेली आहे. किया सेल्टॉस, ह्युंदाई क्रेटासारख्या कारना स्कोडा टक्कर देणार आहे. परंतू गिअर शिफ्टिंग आणि क्लच हार्ड येत असल्याचा मेकॅनिकल किंवा क्वालिटीकडे दुर्लक्ष केल्याचा प्रकार आहे. हे तीन प्रॉब्लेम कारचे नवे फेसलिफ्ट येत नाही तोवर बदलले जात नाहीत. यामुळे अन्य ग्राहकांना जर असाच प्रॉब्लेम येत असेल तर त्याचा फटका या कारच्या मागणीला बसणार आहे. स्कोडाच्या कार या खासकरून शहरातील ग्राहक खरेदी करतात. यामुळे त्यांना क्लच आणि गिअरवर जास्त अवलंबून रहावे लागते. याचा विचार नवे ग्राहक करण्याची शक्यता आहे. संतोष यांनी याबाबत डीलर आणि कंपनीला कळविले आहे.

OMG! मारुती सुझुकी तगडी कार CNG मध्ये आणणार; Brezza चे डिटेल्स लीक

Web Title: Owner of 15 Days Old Skoda Kushaq Lists Out 4 Problems, Gear shifting, Plastic noise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Skodaस्कोडा