Pakistan ची पहिली Electric Car, फुल चार्जमध्ये चालते 210KM; दिसायला Maruti सारखी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 12:53 AM2022-11-15T00:53:33+5:302022-11-15T00:54:18+5:30
या गाडीची टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. हिच्या डिझाईन संदर्भात बोलायचे झाल्यास, ही करा एखाद्या मीनी एसयूव्ही सारखा लुक देते.
भारतीय कार बाजारात इलेक्ट्रिक कारची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. वेगवेगळ्या सेगमेंटमधील अनेक मॉडेल्स आधीपासूनच बाजारात उपलब्ध आहेत. तसेच अनेक नव्या कही लॉनच होण्याच्या तयारीत आहेत. याच वेळी शेजारील देश पाकिस्तानात अद्यापही पहिल्याच इलेक्ट्रिक कारची प्रतीक्षा सुरू आहे. पाकिस्तानची पहिली इलेक्ट्रिक कार NUR-E 75 सध्या प्रोटोटाइप टप्प्यात आहे. तिचे कॉन्सेप्ट मॉडेल याचवर्षी 14 ऑगस्टला सादर करण्यात आले. याच बरोबर, या गाडीच्या फीचर्सचाही खुलासा करण्यात आला होता. ही कार लवकरच लॉन्च होणार आहे. पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ही कार 210KM पर्यंत चालू शकेल.
या कारचे डिझाइन आणि डेव्हलपमेंट डिस्टिंग्विश्ड इनोवेशन, कॅलिबरेशन अॅण्ड आंत्रप्रेन्योरशिप (DICE) फाउंडेशन करत आहे. हे अमेरिका, युरोपियन युनियन आणि जगाच्या इतर भागातून पाकिस्तानी मंडळींकडून चालविले जाणारे एक यूएस-आधारित ना-नफा संघटन आहे. या गाडीत 35kWh चा बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. याच्या मदतीने ही कार संपूर्ण चार्ज झाल्यानंतर 210 किमी पर्यंत चालू शकेल.
या गाडीची टॉप स्पीड 120 किमी प्रति तास आहे. हिच्या डिझाईन संदर्भात बोलायचे झाल्यास, ही करा एखाद्या मीनी एसयूव्ही सारखा लुक देते. आपल्याला ही कार दिसायच्या बाबतीत, भारतात विकल्या जाणाऱ्या मारुती सुझुकी इग्निस (Maruti Suzuki Ignis) सारखी दिसते. विशेष म्हणजे, ही फुली Made in Pakistan इलेक्ट्रिक कार आहे. अर्थात या कारचे सर्वच पार्ट पाकिस्तानातच निर्माण झालेले आहेत. ही कार 8 तासांत फुल चार्ज होऊ शकेल.