...म्हणून बाईकमध्ये पेट्रोल इंजिनऐवजी बॅटरी बसवताहेत लोक; जाणून घ्या, खर्च आणि कसा होतो फायदा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 03:56 PM2021-03-03T15:56:53+5:302021-03-03T16:01:20+5:30
Converting Petrol Engine Bike Into Electric Engine : बाईकमधील पेट्रोल इंजिन काढून त्याजागी अनेक जण बॅटरी बसवून घेत आहेत. म्हणजेच आता गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी बाईकमधील बॅटरी चार्ज करावी लागणार आहे.
नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले असून देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. अशा वेळी देशामध्ये आपल्या सोयीनुसार लोक विविध प्रकारचे जुगाड करताना पाहायला मिळत आहेत. अशातच पेट्रोलचे दर सतत वाढत असताना हा खर्च टाळण्यासाठी लोकांनी एक वेगळाच पर्याय शोधून काढला आहे. पेट्रोलपासून मुक्तता मिळवण्यासाठी काही जण बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये कनव्हर्ट (Convert) करत आहेत.
बाईकमधील पेट्रोल इंजिन काढून त्याजागी अनेक जण बॅटरी बसवून घेत आहेत. म्हणजेच आता गाडीत पेट्रोल टाकण्याऐवजी बाईकमधील बॅटरी चार्ज करावी लागणार आहे. याचाच अर्थ तुमची गाडी आता विजेवर चालू शकते. त्यावरील खर्च हा पेट्रोलच्या खर्चापेक्षा खूपच कमी असल्याची माहिती मिळत आहे. बाईकमधील पेट्रोल इंजिन कन्व्हर्ट कसं होतं? त्याची किंमत किती आहे? असं करणं योग्य आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. अशा काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया...
किती खर्च होतो?
सध्या सोशल मीडियावर अनेक जण जाहिरात करत आहेत. अनेकांनी असा दावा केला आहे की ते त्यांच्या बाईकमधील पेट्रोल इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमध्ये रूपांतरित करीत आहेत. यावर केवळ 10 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगितलं आहे. तसेच बॅटरीनुसार शुल्कही बदलते असं म्हटल जात आहे. एका मेकॅनिकने या बाईकच्या वेगाविषयी दावा केला आहे की बाईक 65-70 किमी इतक्या वेगाने धावते.
इंजिन कसं कन्व्हर्ट केलं जातं?
पेट्रोल इंजिनला इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट करताना, गीअर बॉक्स काढून टाकला जातो आणि त्यानंतर बाईक थेट Accelerator द्वारे नियंत्रित केली जाते. म्हणजेच जशी तुम्ही स्कूटी चालवता अगदी तशीच बाईक चालवता येते. पण अशा प्रकारे स्कूटीचे इंजिन बदलले जाऊ शकत नाही. त्यासाठी बरेच बदल करावे लागतील. त्यामुळे त्यावर खूप खर्च करावा लागतो.
Electric Vehicle Naation : सीएनजी पंपांचीही उभारणी, इलेक्ट्रिक व्हेइकल तंत्रज्ञान हे यापुढील कालावधीत जागतिक स्तरावर दळणवळणाच्या क्षेत्रातील आमूलाग्र बदल घडवून आणणारी बाब ठरणार https://t.co/zPFEK8VUKr#ElectricVehicle#Pune
— Lokmat (@MiLOKMAT) March 3, 2021
किती फायदा होणार?
बॅटरी तुम्ही 2 तास चार्ज केली तर ही बाईक 40 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. बॅटरी पूर्ण चार्ज केली तर बाईक तब्बल 300 किमीपर्यंतची रेंज देते असा दावा केला जात आहे. मात्र हे तुम्ही कोणती बॅटरी वापरता यावर अवलंबून आहे.
तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या बाईकमधील इंजिन बदलत असाल तर हा कायद्याने गुन्हा आहे. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 52 नुसार कोणत्याही मोटार वाहनात बदल करणे, इंजिन बदलणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या नियमाप्रमाणे कोणतीही व्यक्ती कंपनीने बनवलेल्या कार किंवा बाईकमध्ये बदल करू शकत नाही. जर तसे केले तर हा गुन्हा ठरतो आणि तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तसेच इंजिन बदलल्यामुळे तुमचा विमा देखील समाप्त होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना तुमची नजर वेगाने धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोलhttps://t.co/dSk0lEKoNy#RahulGandhi#Congress#NarendraModi#ModiGovt#FuelPriceHikepic.twitter.com/ugSsbnCofm
— Lokmat (@MiLOKMAT) February 22, 2021