Petrol @100: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पेट्रोलचा दर चक्क 100 झाला; जाणून घ्या आणखी किती वाढणार....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:33 PM2021-05-12T13:33:05+5:302021-05-12T13:38:29+5:30

Petrol Price crossed 100 Rs mark in Maharashtra: आज पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 25 पैसे वाढ झाली आहे. याचबरोबर दिल्लीत पेट्रोल 92.05 रुपये तर डिझेल 82.61 रुपये लीटर झाले. मुंबईमध्ये पेट्रोल 98.36 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये लीटर झाले आहे.

Petrol rate today: price of petrol in Sindhudurg district of Maharashtra has gone on 100; Find out how much more will grow .... | Petrol @100: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पेट्रोलचा दर चक्क 100 झाला; जाणून घ्या आणखी किती वाढणार....

Petrol @100: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पेट्रोलचा दर चक्क 100 झाला; जाणून घ्या आणखी किती वाढणार....

Next

Petrol Price today: मे महिन्याचा सुरुवातीला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागताच दोन दिवसांनी देशभरात पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढायला (Patrol, Diesel Price Hike) सुरुवात झाली. दिल्लीत 90 दी पार केलेले पेट्रोल अनेक ठिकाणी शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. तर महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये पेट्रोलच्या दराने बरोब्बर 100 चा आकडा गाठला आहे. (Petrol Price crossed 100 rupees per liter rate in Maharashtra Sindhudurg.)


आज पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली. दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 25 पैसे वाढ झाली आहे. याचबरोबर दिल्लीत पेट्रोल 92.05 रुपये तर डिझेल 82.61 रुपये लीटर झाले. मुंबईमध्ये पेट्रोल 98.36 रुपये आणि डिझेल 89.75 रुपये लीटर झाले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 98.84 रुपये आणि डिझेल 87.49 रुपये लीटर झाले आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोल 92.16 रुपये आणि डिझेल 85.45 रुपये लीटर झाले आहे. 

TATA मारुती, ह्युंदाईला टक्कर देणार; लोकप्रिय Tiago सीएनजीमध्ये येणार


महाराष्ट्रातील मुंबईमध्ये पेट्रोल शंभरीपार जाण्यास अद्याप दीड रुपयांचा फरक असला तरीदेखील महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमध्ये पेट्रोलच्या दराने नेमका 100 रुपये प्रति लीटरचा दर गाठला आहे. सिंधुदुर्गला मिरज येथील ऑईल कंपन्यांच्या डेपोमधून पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होतो. पेट्रोल, डिझेलचे दर हे डेपो ते पेट्रोल पंपांच्या अंतरानुसार कमी जास्त होत असतात. यानुसार मालवण आणि कट्टा येथील पेट्रोलच्या दरांनी 100 री गाठली आहे. तसेच इतर ठिकाणचे दरही काहीशा पैशांनी शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर आहेत. 


आणखी किती दरवाढ होणार....
पेट्रोल, डिझेलची दरवाढ पाहला असे वाटू लागले आहे की, क्रेडिट लुईसची भविष्यवाणी खरी ठरणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये आणखी 5.5 रुपयांची दरवाढ होणार आहे. पेट्रोल पुरविणाऱ्या कंपन्यांनी तोटा भरून काढण्याचा प्रयत्न केला तर पेट्रोलच्या दरात 5.5 रुपयांची प्रति लीटर वाढ आणि डिझेलच्या दरांत 3 रुपये प्रति लीटर वाढ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली. परंतू भारताला जे कच्चे तेल येते त्याचा दर हा आजचा नसतो तर जवळपास 25 दिन आधीच्या दराने पुरवठा होतो. 

 

वेळोवेळी दरवाढ
देशात पेट्रोल १०० रुपयांच्या वर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील पाच दरवाढींत पेट्रोल १.१४ रुपयांनी, तर डिझेल १.३३ रुपयांनी महागले आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात मोठी वाढ केली होती. या करवाढीनंतर सरकारी तेल वितरण कंपन्यांनीही वेळोवेळी दरवाढ करून पेट्रोल २१.५३ रुपयांनी, तर डिझेल १९.१८ रुपयांनी महाग केले.

Web Title: Petrol rate today: price of petrol in Sindhudurg district of Maharashtra has gone on 100; Find out how much more will grow ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.