पॉवर पेट्रोलमुळे खरंच बाईकचे मायलेज वाढते? जाणून घ्या नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमधील फरक...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 03:54 PM2024-07-26T15:54:12+5:302024-07-26T15:54:41+5:30

सामान्य पेट्रोलपेक्षा पॉवर पेट्रोल थोडे महाग असते.

Petrol vs Power Petrol: Does Power Petrol Increase Bike Mileage? Know difference between normal and power petrol | पॉवर पेट्रोलमुळे खरंच बाईकचे मायलेज वाढते? जाणून घ्या नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमधील फरक...

पॉवर पेट्रोलमुळे खरंच बाईकचे मायलेज वाढते? जाणून घ्या नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमधील फरक...

Power Petrol Benefits : तुम्ही अनेकदा आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला असाल. पंपावर दोन प्रकारचे पेट्रोल मिळते. एक असते नॉर्मल पेट्रोल आणि दुसरे पॉवर पेट्रोल. या दोन्ही पेट्रोलच्या किमतीही वेगवेगळ्या आहेत. तुमच्यापैकी काहीजण आपल्या गाडीत नॉर्मल पेट्रोल भरत असाल, तर काहीजण पॉवर पेट्रोल. पण, या दोन्ही पेट्रोलमधील फरक तुम्हाला माहित आहे का? चला जाणून घेऊ...

सामान्य वि पॉवर पेट्रोल: फरक काय आहे?
पॉवर पेट्रोलला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. पॉवर पेट्रोल, एक्स्ट्रा माईल, स्पीड आणि हाय स्पीड अशी पॉवर पेट्रोलला नावे आहेत. पॉवर पेट्रोल हे प्रीमियम इंधन आहे आणि दोन्हीमधील फरक हा आहे की पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेन कंटेट जास्त असतो. सामान्य पेट्रोलमध्ये ऑक्टेन रेटिंग 87 पर्यंत असते, तर पॉवर पेट्रोलमध्ये ऑक्टेन रेटिंग 91 ते 94 पर्यंत असते.

ऑक्टेन म्हणजे काय?
जास्त ऑक्टेन असलेले पेट्रोल इंजिन नॉकिंग आणि इंजिनमधील डेटोनेटिंग कमी करण्यास मदत करते. इंजिन नॉकिंग आणि डिटोनेटिंगच्या मदतीने इंजिनमधून येणारा आवाज नियंत्रित केला जातो. ऑक्टेनचा फायदा असा आहे की, त्याच्या मदतीने इंजिन पूर्ण क्षमतेने कार्य करते आणि इंजिनची लाईफदेखील वाढते.

पॉवर पेट्रोलचे काय फायदे आहेत?
सामान्य पेट्रोलपेक्षा प्रीमियम किंवा ​​पॉवर पेट्रोल महाग आहे, पण त्याचे फायदे देखील आहेत. पॉवर पेट्रोलमुळे तुमच्या वाहनाचे मायलेज वाढते. मायलेज वाढवण्याव्यतिरिक्त, इंजिनची कार्यक्षमता देखील सुधारते आणि वाहनाला हिवाळ्याच्या हंगामात चांगला कोल्ड स्टार्ट मिळतो.

Web Title: Petrol vs Power Petrol: Does Power Petrol Increase Bike Mileage? Know difference between normal and power petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.