सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंज; Poise NX120 आणि Poise Grace इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 03:48 PM2022-03-12T15:48:35+5:302022-03-12T17:06:39+5:30
Poise Scooters Launched 2 Electric scooters : Poise ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर्स रिम्यूव्हेबल बॅटरीसह येतात, ज्या कुठेही चार्ज केल्या जाऊ शकतात.
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप्स भारतीय बाजारपेठेत त्यांची वाहने सतत लॉन्च करत आहेत, विशेषत: सध्या इलेक्ट्रिक दुचाकींचा ट्रेंड आहे. शानदार फीचर्स असलेली ही वाहने ग्राहकांच्या पसंतीस उतरत असून दर महिन्याला वाहनांची विक्री अनेक पटींनी वाढत आहे. यापैकी एक Poise स्कूटर्स आहे. Poise ने भारतात दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या आहेत. या दोन्ही स्कूटर्स रिम्यूव्हेबल बॅटरीसह येतात, ज्या कुठेही चार्ज केल्या जाऊ शकतात. अशातच जर तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल तर ही इलेक्ट्रिक स्कूटर एक उत्तम पर्याय असू शकते.
सिंगल चार्जमध्ये 110 किमीपर्यंत रेंज
Poise ने NX-120 आणि Poise Grace लाँच केले आहेत, ज्याची किंमत अनुक्रमे 1.24 लाख आणि 1.04 लाख रुपये आहे. या किमती एक्स-शोरूम कर्नाटकातील आहेत. कंपनीने दावा केला आहे की, Poise Grace आणि NX-120 सोबत बसवण्यात आलेली लिथियम-आयन बॅटरी सिंगल चार्जवर 110 किमी पर्यंतची रेंज देते. या स्कूटर्स कमाल 55 किमी/तास वेगाने चालवल्या जाऊ शकतात, जे कमी अंतर कापण्यासाठी योग्य आहे. या दोन स्कूटर्स व्यतिरिक्त, कंपनी आणखी अनेक प्रोडक्ट्सवर काम करत आहे, ज्यापैकी एक जुईंक हाय-स्पीड स्कूटरचा समावेश आहे.
यशवंतपूरमध्ये होतंय स्कूटर्सचे प्रोडक्शन
आगामी स्कूटरबद्दल कंपनीने अजून जास्त माहिती दिलेली नाही पण ती जास्तीत जास्त 90 किमी/तास वेगाने चालवली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. या स्कूटर्सचे प्रोडक्शन बंगळुरूमधील यशवंतपूर येथे केले जात आहे, जे अतिशय अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काम केले जात आहे. या प्लांटमध्ये वर्षाला 30,000 इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन केले जाऊ शकते आणि मागणी वाढीनुसार ही उत्पादन क्षमता 1 लाख युनिटपर्यंत वाढवता येऊ शकते.