BMW च्या 'या' इलेक्ट्रिक कारला दमदार प्रतिसाद, पहिल्याच दिवशी बुक झाल्या सर्व कार; जाणून घ्या फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 04:23 PM2021-12-14T16:23:33+5:302021-12-14T16:23:44+5:30

कंपनीने सांगितल्यानुसार, पुढच्या वर्षी मार्च महिन्यापर्यंत या कारची डिलीव्हरी मिळेल. तसेच, पुढील बुकिंग येत्या वर्षाच्या सुरुवातीला होईल.

Powerful response to BMW's electric car in India, all cars booked on the first day | BMW च्या 'या' इलेक्ट्रिक कारला दमदार प्रतिसाद, पहिल्याच दिवशी बुक झाल्या सर्व कार; जाणून घ्या फीचर्स...

BMW च्या 'या' इलेक्ट्रिक कारला दमदार प्रतिसाद, पहिल्याच दिवशी बुक झाल्या सर्व कार; जाणून घ्या फीचर्स...

googlenewsNext

BMW कारच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक कारला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या कारचे सर्व युनिट्स विकल्या गेले आहेत. आज (14 डिसेंबर) ही माहिती देताना कंपनीने सांगितले की, त्यांच्या BMW iX इलेक्ट्रिक SAV (स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी व्हेईकल) ची पहिली खेप पहिल्याच दिवशी म्हणजेच लॉन्चच्या दिवशी विकली गेली. ही SAV सोमवारी कंपनीने लॉन्च केली होती.

कधी मिळणार डिलीव्हरी
कंपनीने जारी केलेल्या निवेदनानुसार, बुकिंगच्या पहिल्या टप्प्याला ग्राहकांचा ऑनलाइन आणि देशभरात पसरलेल्या BMW इंडिया डीलरशिपद्वारे जबरदस्त प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षी एप्रिल 2022 पासून या गाड्यांची डिलिव्हरी सुरू होईल. ही कार भारतात कम्प्लीली-बिल्ट-अप युनिट(CBU) म्हणून लॉन्च करण्यात आली होती. या कारची किंमत 1.15 कोटी रुपये (एक्स-शोरुम) आहे.

पुढील टप्प्यासाठी बुकिंग मार्च 2022 च्या तिमाहीत सुरू होईल
या कारची पहिली खेप पूर्णपणे सोल्ड आउट झाली आहे. आता ही कार घेण्यासाठी इतर ग्राहकांना काहीकाळ वाट पाहावी लागणार आहे. कंपनीने सांगितल्यानुसार, दुसऱ्या टप्प्याचे बुकिंग पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्च 2022 मध्ये सुरू होईल. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावग यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात BMW iX च्या यशाबद्दल त्यांना खात्री होती, परंतु पहिल्या दिवशी ग्राहकांच्या प्रतिसाद मिळेल, हे माहित नव्हतं. यानंतर आता कंपनीने पुढील टप्प्यांच्या बुकिंगची तयारी सुरू केली आहे.

BMW iX चे वैशिष्ट्ये

  • BMW iX ला जागतिक स्तरावर दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे.iX xDrive 40 आणि iX xDrive 50. परंतु, भारतात फक्त याचे iX xDrive 40 व्हेरिएंट लॉन्च करण्यात येणार आहे. 
  • xDrive 40 व्हेरिेंट 326 hp पॉवर आणि 630 Nm पीक टार्क जनरेट करू शकते.
  • xDrive 40 व्हेरिएंटला ताशी 0-100 किमीचा वेग मिळवण्यासाठी 6.1 सेकंदाचा वेळ लागतो.
  • BMW iX मध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर(प्रत्येक एक्सलवर एक) दिली आहे, तर एक ऑल-व्हील-ड्राइव सिस्टीम स्टँडर्डदेण्यात आला आहे. याचा वापर प्यिओर रअयर-व्हील-ड्राइव सेट-अपमध्ये केला जाऊ शकतो.
  • ड्रायविंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही xDrive 40 एका चार्जिंगमध्ये 425 किमी चालू शकते.
  • 150 kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने या गाडीला फक्त 31 मिनीटांत 10 ते 80 चार्ज करता येते. 

Web Title: Powerful response to BMW's electric car in India, all cars booked on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.