जीपच्या ऑल-न्यू ग्रँड चेरोकीसाठी प्री-बुकिंग सुरु; सर्व प्रवाशांना सीटबेल्ट रिमाईंडर मिळणार...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 02:29 PM2022-11-08T14:29:55+5:302022-11-08T14:30:13+5:30
या एसयुव्हीने ३० वर्षांपूर्वी पदार्पण केले होते. नवीन आर्किटेक्चर आणि एरोडायनॅमिक बॉडी स्टाइल देण्यात आली आहे.
पुणे : जीप इंडियाने 5व्या पिढीतील ग्रँड चेरोकीचे उत्पादन पुण्यातील रांजणगाव येथील प्रकल्पात सुरू केले आहे. नवीन आर्किटेक्चर आणि एरोडायनॅमिक बॉडी स्टाइल देण्यात आली आहे. जीपच्या वेबसाईटवर किंवा निवडक शोरुममध्ये बुकिंग सुरु झाले असून महिन्याच्या अखेरीस ही एसयुव्ही डिलिव्हर केली जाणार आहे.
या एसयुव्हीने ३० वर्षांपूर्वी पदार्पण केले होते. काय आहेत वैशिष्ट्ये...
फुल सूट – फुल-स्पीड फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग प्लस पेडेस्ट्रीअन इमर्जन्सी ब्रेकिंग, स्टॉप अँड गोसह अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट आणि क्रॉस पाथ डिटेक्शन, पॅसिव्ह पेडेस्ट्रीअन संरक्षण, ड्रॉसिव्ह ड्रायव्हर, अॅक्टिव्ह ड्रायव्हर यासारख्या वैशिष्ट्यांसह प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (एडीएएस) मॅनेजमेंट सिस्टम आणि इंटरसेक्शन कोलिजन असिस्ट सिस्टम देण्यात आली आहे.
याचबरोबर अॅक्टिव नॉईस कंट्रोल सिस्टिम देण्यात आली आहे. नव्या सेफ्टी नॉर्मनुसार थ्री पॉईंट सीटबेल्ट आणि पाचही पॅसेंजरसाठी बसल्यानंतरची डिटेक्शन सिस्टिम देण्यात आली आहे. यामुळे सर्वांना सीटबेल्ट रिमाईंडर दिला जाणार आहे. ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे कार कस्टमाईज करण्यासाठी अनेक पर्याय आहेत.
स्लिम एचव्हीएसी व्हेंट्स असलेले इंटीरियर फ्रंट पॅनल, ड्रायव्हरला चांगली सुलभता मिळण्यासाठी प्रारंभिक वैशिष्ट्यांसह 10” हेड अप डिस्प्लेची पुर्नरचना, 10.1-इंच (25.6-सेमी) टचस्क्रीन रेडिओ, 10.25-इंच (26-सेमी) इन्स्ट्रुमेंट क्लस्टर पॅनेल तसेच सेगमेंट-फर्स्ट 10.25-इंच (26-सेमी) फ्रंट पॅसेंजर इंटरएक्टिव्ह डिस्प्ले देण्यात आला आहे.
क्वाड्रा-ट्रॅक I 4x4 सिस्टीम आणि सिलेक-टेरेन ट्रॅक्शन मॅनेजमेंट सिस्टीम जी 4x4 कार्यप्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी ऑन-रोड आणि ऑफ-रोड सेटिंग्ज दरम्यान पर्याय निवडता येतो.