गाड्यांचा इन्शुरन्स महागला, कार खरेदी करणाऱ्यांना मोजावे लागणार आता दुप्पट पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 04:03 PM2018-10-11T16:03:26+5:302018-10-11T16:06:49+5:30
दुचाकी नवीन घेणा-यांना मोटारसायकलच्या किमतीच्या 10 टक्के विम्याचे पैसे भरावे लागतात.
मुंबईः दुचाकी नवीन घेणा-यांना मोटारसायकलच्या किमतीच्या 10 टक्के विम्याचे पैसे भरावे लागतात. त्याच प्रमाणे आता नवीन गाडी(चारचाकी) घेणा-यांनाही विम्यासाठी ठरावीक रकमेच्या दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे न्यायालयानं गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन निर्णय दिले होते. त्यामुळेच वाहन चालकांना इन्शुरन्सवर दुप्पट पैसे द्यावे लागणार आहेत. कारण आता थर्ड पार्टी इन्शुरन्स सक्तीचा करण्यात आला आहे. त्याप्रमाणेच न्यायालयानं वाहन चालकांना 15 लाखांचा अपघात विमा संरक्षण काढण्याचीही अट घातली आहे.
दीर्घकालीन प्रीमियम पेमेंट्समुळे नव्या गाड्यांच्या किमतीही वाढल्या आहेत. जर तुम्ही कोणतीही दुचाकी खरेदी करण्यास जात असाल तर तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स घेणं अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच याबरोबरच तुम्हाला वार्षिक अपघात विमाही काढावा लागणार आहे. त्यानुसारच दुचाकी घेणा-या ग्राहकांना मोटारसायकलच्या किमतीच्या 10 टक्के रक्कम इन्शुरन्समध्ये गुंतवावी लागणार आहे.
उदा. जर तुम्ही 150 सीसीची एखादी बाइक 75 हजार रुपयांना खरेदी करत असाल तर तुम्हाला 7600 रुपये इन्शुरन्ससाठी मोजावे लागणार आहेत. तसेच तुम्ही वाहन खरेदी केले, तरीही तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्स घ्यावा लागणार आहे. तसेच वाहनचालकाला 3 वर्षांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स सक्तीचा करण्यात आला आहे. त्याशिवाय अपघात विम्यासाठी तुम्हाला अतिरिक्त 750 रुपये मोजावे लागणार आहेत. 1000 सीसीच्या जास्त क्षमतेच्या गाड्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला इन्शुरन्ससाठी जवळपास 20 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.
काय आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स ?
मोटार वाहन कायद्यानुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स कायदेशीर आहे. नावावरूनच स्पष्ट होते. हा विमा तिसऱ्या पक्षाशी संबंधित आहे. पहिला पक्ष म्हणजे विमा विकत घेणारा, दुसरा पक्ष विमा कंपनी आणि तिसरा म्हणजे आपल्यामुळे ज्याच्या गाडीचे नुकसान झाले आहे असा व्यक्ती. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये या तिसऱ्या व्यक्तीलाच नुकसान भरपाईची रक्कम दिली जाते. यामध्ये विमा घेणाऱ्या व्यक्तीला काहीही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच तिसऱ्या पक्षाचा मृत्यू किंवा गंभार दुखापत झाल्यास त्याला भरपाई देण्याचीही कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.