Kia, Mahindra आणि Hyundai ने कारच्या किंमती वाढवल्या, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 12:08 PM2023-10-04T12:08:36+5:302023-10-04T12:09:26+5:30
वाहन उत्पादक कंपन्यांनी काही एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत.
नवी दिल्ली : या सणासुदीच्या मोसमात जर तुम्ही नवीन एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दरम्यान, आता तुम्हाला नवीन एसयूव्हीसाठी थोडे जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेच. कारणवाहन उत्पादक कंपन्यांनी काही एसयूव्हीच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये Kia Seltos, Mahindra XUV700, Honda City, Hyundai Venue सारख्या लोकप्रिय कारचा समावेश आहे.
किआ इंडियाने 1 ऑक्टोबरपासून नुकत्याच लाँच केलेल्या Seltos आणि Carens च्या किमतीत 50,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. आता महिंद्राबद्दल बोलायचे झाल्यास, वाढत्या मागणीमुळे महिंद्राने स्कॉर्पिओ क्लासिक, स्कॉर्पिओ-एन एक्सयूव्ही300, एक्सयूव्ही 700 आणि थारच्या किमतीत 81,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. बेस AX (O) MT किंमत 14.03 लाख रुपये आहे. थार LX AT RWD ची किंमत 13.77 लाख रुपये आहे.
थार पेट्रोलच्या एलएक्स एमटी आणि एटी ट्रिमची किंमत 14.72 लाख रुपये आणि 16.26 लाख रुपये झाली आहे. याशिवाय, ह्युंडाई व्हेन्यू आणि टक्सनच्या किमतीत 48 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता होंडा बद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या लोकप्रिय सेडान सिटी आणि अमेज सेडान च्या किमतीत 7,900 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
का किंमती वाढल्या?
वाहन उत्पादक कंपन्यांनी किंमती वाढवल्या आहेत, कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाहनांमध्ये अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत.