BMW Car: पुणे-मुंबई-पुणे दोनदा जाऊन येऊन करता येणार; BMW 3 लाँच होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 06:16 PM2021-10-19T18:16:41+5:302021-10-19T18:17:11+5:30
Next Gen BMW 3 Series Electric Car Launch Range: बीएमडब्ल्यू लवकरच BMW 3 Series चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करेल असे म्हटले जात होते. मात्र, बीएमडब्ल्यू आता ईलेक्ट्रीक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.
इलेक्ट्रीक कारनी भारतीयांना भुरळ घालण्यास सुरुवात केली आहे. परंतू चार्जिंग पॉईंट, किंमत आणि रेंज यामुळे आजही ही वाहने अनेकांच्या स्वप्नातच आहेत. टाटाने 12-15 लाखांत इलेक्ट्रीक कार लाँच केल्याने मागणी वाढली आहे. परंतू फारफारतर कागदावर 310 किमीची रेंज पण प्रत्यक्षात 250 च्या आसपास रेंज मिळत आहे. यामुळे लोक जास्त रेंजच्या गाड्या कधी येतील याची वाट पाहत आहेत.
भारतील बाजारात गेल्या दोन वर्षांत स्वस्त-महागड्या इलेक्ट्रीक कार लाँच झाल्या आहेत. आता लग्झरी कार बनविणारी कंपनी BMW लवकरच Next Generation BMW 3 Series Electric Car लाँच करणार आहे. ही कार सिंगल चार्जिंगमध्ये 700 किमीपेक्षा जास्तीची रेंज देणार आहे. म्हणजेच पुणे-मुंबई-पुणे हा प्रवास दोनदा करता येणार आहे.
बीएमडब्ल्यू लवकरच BMW 3 Series चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच करेल असे म्हटले जात होते. मात्र, बीएमडब्ल्यू आता ईलेक्ट्रीक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कार 2025 पर्यंत रस्त्यांवर दिसणार आहेत. परदेशी कंपन्यांनी आपले लक्ष्य इलेक्ट्रीक कारवर वळविले आहे. यामुळेच फोर्डने देखील भारतातील व्यवसाय बंद केला आहे.
BMW आपल्य़ा इलेक्ट्रीक कारसाठी नवीन पावरट्रेनवर काम करत आहे. ऑटोकार युकेनुसार बीएमडब्ल्यू आपल्या कारसाठी 350 kW चार्जिंग सपोर्टवाली चार्जिंग सिस्टिम तयार करत आहे. यामुळे BMW 3 Series च्या वाहनांची रेंज ही 700 किमीपेक्षा जास्त असणार आहे. तसेच टॉप स्पीडमध्येही ती अव्वल असणार आहेत.