Pure ecoDryft 350 : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक लाँच, सिंगल चार्जमध्ये 171 किमीपर्यंत रेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 01:48 PM2023-11-22T13:48:07+5:302023-11-22T13:49:04+5:30
ही इलेक्ट्रिक बाईक कंपनीच्या अधिकृत डीलर्समार्फत बुक केली जाऊ शकते.
नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्युअर ईव्हीने (Pure EV) ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रिक बाईक (Electric Bike) लाँच केली आहे. Pure ecoDryft 350 असे या बाईकचे नाव आहे. ही इलेक्ट्रिक बाईक कंपनीच्या अधिकृत डीलर्समार्फत बुक केली जाऊ शकते.
जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर नक्कीच तुम्हाला ही नवीन बाईक आवडेल. कारण, ही बाईक कमी किमतीत चांगली ड्रायव्हेबिलिटी रेंज देते, असा दावा कंपनीचा आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, Pure ecoDryft 350 बाईकमुळे ग्राहकांना महिन्याला 7 हजार रुपयांची बचत करता येईल. तसेच ही बाईक तीन वेगवेगळ्या मोड्समध्ये मिळेल.
या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कंपनीने 3.5kWh लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी 6 MCU आणि 4 hp इलेक्ट्रिक मोटरसह येते. तसेच, या बाईकसोबत तुम्हाला 75 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळेल, जो 40Nm चा टॉर्क जनरेट करेल. ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाल्यास फुल चार्ज केल्यावर 171 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापेल, असे कंपनीचे म्हणणे आहे. या इलेक्ट्रिक बाईरमध्ये रिव्हर्स मोड, हिल स्टार्ट असिस्ट ते डाउन हिल असिस्ट आणि पार्किंग असिस्ट अशी अनेक फीचर्स देण्यात आली आहेत.
कंपनीचे म्हणणे आहे की, स्टेट ऑफ चार्ज आणि स्टेट ऑफ हेल्थनुसार, बाईकची स्मार्ट एआय टेक्नॉलॉजी दीर्घ बॅटरीचे आयुष्य सुनिश्चित करते. या इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची किंमत 1 लाख 30 हजार रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, या किमतीत ही बाईक होंडा शाइन, हिरो स्प्लेंडर आणि बजाज प्लॅटिना यांसारख्या प्रवासी बाईक्स आणि हॉप ऑक्सो सारख्या इलेक्ट्रिक बाइक्सशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहे.