एकट्यासाठी गाडी बुक करताय...कशाला? आता भाड्याने मिळणार बाईक अन् सोबत ड्रायव्हरही; जाणून घ्या, नेमकं कसं 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 03:44 PM2021-02-23T15:44:41+5:302021-02-23T15:48:02+5:30

Rapido Rental Services : फक्त बाईकच नाही तर यासोबत ड्रायव्हरही मिळणार असून कमी पैशात हव्या तितक्या ठिकाणी फिरता येणार आहे. 

rapido rental services launched in delhi chennai kolkata and bengaluru | एकट्यासाठी गाडी बुक करताय...कशाला? आता भाड्याने मिळणार बाईक अन् सोबत ड्रायव्हरही; जाणून घ्या, नेमकं कसं 

एकट्यासाठी गाडी बुक करताय...कशाला? आता भाड्याने मिळणार बाईक अन् सोबत ड्रायव्हरही; जाणून घ्या, नेमकं कसं 

Next

नवी दिल्ली - कामानिमित्त एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास बस, रेल्वे अशा सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याऐवजी सध्या खासगी गाड्यांचा वापर केला जातो. ओला, उबेरच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत गाडी उपलब्ध होते. तसेच सहज आणि सुखकर प्रवास देखील करता येतो. मात्र आता तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला प्रवास करायचा असेल तर मोठी गाडी बुक करण्याची गरजच भासणार नाही. कारण आता भाड्याने बाईक मिळणार आहे. फक्त बाईकच नाही तर यासोबत ड्रायव्हरही मिळणार असून कमी पैशात हव्या तितक्या ठिकाणी फिरता येणार आहे. 

बाईक टॅक्सी सेवा देणारी कंपनी Rapido ने देशातील सहा प्रमुख आणि मोठ्या शहरांमध्ये बाईक भाड्याने देण्याची सेवा (Rapido Rental Services) सुरू केली आहे. बंगळुरू, दिल्ली एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि जयपूर येथे रॅपिडो भाडे सेवा सुरू करण्यात आली आहे. तर काही दिवसांनी मुंबईमध्येही सेवा सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या खास सुविधेमध्ये एक तास, दोन तास, तीन तास, चार तास आणि सहा तासांचं पॅकेज आहे. यामध्ये बाईकची बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक ‘कॅप्टन’ म्हणजेच रॅपिडो ड्रायव्हर पार्टनर देखील मिळेल जो सतत तुमच्याबरोबर राहील आणि तुम्ही त्याला तिथे जायचं असेल तिथे घेऊन जाईल. 

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा खासकरून अशा ग्राहकांसाठी आहे जे दिवसभर कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळं बुकींग करण्याची गरज भासते. मात्र यामध्ये ग्राहकाला वारंवार बुकिंगची करण्याची गरज नाही. दिवसातून एकदा बुक केलं तर कॅप्टन त्यांच्या सेवेसाठी तयार असणार आहे. कामामिनित्त अनेक जण विविध ठिकाणांना भेट देत असतात. अशा मंडळींसाठी हे उपयुक्त ठरणार आहे. 

रॅपिडोचे सहसंस्थापक अरविंद संका यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत वारंवार मल्टी स्टॉप, परवडणारी आणि सहज उपलब्ध राईडची मागणी काळाबरोबर वाढत आहे. विशेषतः कोरोनाच्या संकटानंतर याला वेग आला आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा 100 शहरांमध्ये वाढवण्याची आमची योजना आहे. सध्या रॅपिडो देशातील 100 शहरांमध्ये टॅक्सी बाईक म्हणून उपलब्ध आहे. Rapido rental services चा अनेकांना फायदा होणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: rapido rental services launched in delhi chennai kolkata and bengaluru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bikeबाईक