वास्तवदर्शी आरसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 03:42 PM2017-08-08T15:42:57+5:302017-08-08T15:43:08+5:30

कारचा आरसा रुपदर्शनासाठी नाही तर मागलदर्शनासाठी आहे. त्यामुळे होणारे तुमच्या कारच्या मागच्या रस्त्यावरचे दर्शन तुम्हाला अत्यंत मोलाचे मार्गदर्शन करणारे असते. आरशाविना चुकल्यासारखेही वाटावे, अशीच स्थिती अनेक चालकांची होत असते.

Realistic mirror | वास्तवदर्शी आरसा

वास्तवदर्शी आरसा

googlenewsNext

आरसा हे तुमचे रूप जसेच्या तसे दाखवणारी एक आगळी वस्तू आहे. किंबहुना त्यावरच तुम्ही स्वतःची इमेजही घडवत असता. कारमधील आरसे हे देखील तसेच काहीसे आहेत. तुम्ही त्यात तुमचे रूप पाहात नाही पण मागच्या हालचालींचे वास्तवदर्शन सतत घेत असता. खरे म्हणजे आरशावर लिहिलेले असते की मागची स्थिती ही अधिक जवळ दिसणारी आहे. तुमच्या कारमागे काय घडत आहे यावर कार चालवताना तुम्हाला बारकाईने नजर ठेवणे आवश्यक आहे. समोरच्या बरोबरच अनेकदा तुम्हाला मागलदर्शनाची गरज असते, कारण त्यामुळे कार सुरक्षितपणे चालवण्यासाठी मार्गदर्शन होत असते. कार वा तुमचे वाहन चालवताना पुढे काय स्थिती आहे यावर तुमची नजर जशी असायला हवी तशी अनेक परिस्थितीमध्ये मागे काय आहे, यावरही नजर असायला हवी. आरशाची महती जशी एखाद्या तरुण स्त्रीला जशी चांगली माहिती असते, तसेच कार चालवणाऱ्यालाही ही महती समजणे गरजेचे आहे. वाहन मागे घेताना ड्रायव्हरला मागे बघूनच वाहन मागे घ्यावे लागते. पण त्यासाठी सतत मान वळवून तसे करणे अनेकांना शक्य नसते, यासाठी तुम्हाला मागल्या दर्शनाची स्थिती अचूकपणे कळू शकते ती या आरशामुळे. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनाविना व इलेक्ट्रिक वापराविना वा सेन्सरविना तु्हाला ही स्थिती दाखवणारा आरसा हा अतिशय साधासुधा असला तरी तो जास्त प्रभावी आहे. 

सर्वसाधारणपणे कारला डाव्या व उजव्या बाजूलाही आज छानपैकी आरसे बसवण्याची सोय झाली आहे. पावसाळ्यात काहीवेळा या आरशांवर पाणी साचल्याने मागचे नीट दिसत नाही. पण त्यासाठी सेंटर मिररची सोय असते. या तीनही आरशांमधून कार मागे घेताना, कार रस्त्यावर पुढे चालवत असतानाही मागून कोण येत आहे, तो चुकीच्या पद्धतीने येत असेल तर तुम्हाला सावध होता येते, तर तुम्हालाही ओव्हरटेक करताना मागून वाहन येत नाही ना हे कळते तर ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाला ओलांडल्यानंतर त्याच्या पुढे त्याच्या रांगेत यायचे तेव्हा ते वाहन सुरक्षित अंतरावर मागे आहे ना हे सांगणारा आरसा असतो. 

वाहन चालवतानाच कशाला गाडी पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी उभी असताना, तुमच्या पेट्रोलच्या टाकीचे झाकण नीट उघडले गेले आहे की, नाही ते सुद्धा कळते. पार्किंगमध्ये असताना वा सिग्नलला उभे असतानाही तुमच्या मागच्या हालचाली टिपण्यासाठी हाच आरसा उपयोगी ठरतो. आरशाच्या वापराला पर्याय म्हणून आज सेन्सर्स वा कॅमेरे आले असले तरी आरशासारखे ते स्वस्त नसतात किंवा त्यांना अन्य आणखी कोणत्याही बॅटरी ऊर्जेची गरज लागत नाही. त्यामुळे बॅटरीमुळे काही अडचण असेल तर आरसा बंद पडण्याचा सवाल येत नाही. अर्थात आज बॅटरीवर बाहेरच्या बाजूने ऑपरेट होणारे आरसे आले आहेत.  अन्य काही वैशिष्ट्ये असमारे आरसेही आहेत, त्यात रात्रीच्यावेळी मागच्या वाहनाच्या प्रखर हेडलॅम्पचा त्रास वाचवणारा नाईट व्हिजन आहे, किंवा त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर करून बाण व मागच्या रस्त्याची साईडलाईन नीटपणे सांगणाराही एक सुधार त्यात आणला आहे. पण तरीही साधासुधा असलेला आरसाही तितकाच आपले महत्त्व रारून आहे. पण त्यातील प्रतिबिंब हे तुम्हाला दिसते ते त्या बॅटरीमुळे नाही, तर आरशाच्या प्रतिबिंब दाखवण्याच्या गुणामुळे. अगदी सहज तुम्हीच विचार करून पाहा, कार, च्रक, बस, स्कूटर वा मोटारसायकल यांना आरसा नसेल तर किती चुकल्यासारखे होईल. हो पण त्याच्या वापराची सवयही नेहमी ठेवायला हवी. केवळ रूपदर्शनासाठी आरसा नाही तर तुमच्या सुरक्षिततेसाठीही तो वापरला जाते, हेच वाहनाला असलेल्या आरशाने सिद्ध केलेले आहे.

Web Title: Realistic mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.