स्मार्टफोननंतर आता भारतात येणार Realme इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार?
By सिद्धेश जाधव | Published: October 30, 2021 07:35 PM2021-10-30T19:35:19+5:302021-10-30T19:37:05+5:30
Realme Electric Scooter: Realme कंपनी इलेक्ट्रिक स्कुटर आणि कार सादर करू शकते, अशी माहिती रिपोर्ट मधून आली आहे.
स्मार्टफोन निर्माता चिनी कंपनी रियलमी लवकरच इलेक्ट्रिक व्हेईकल सेगमेंटमध्ये एंट्री करू शकते. रियलमीने व्हेईकल सेगमेंटमध्ये एंट्री करण्यासाठी ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे, अशी माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे. याबाबत कंपनीने मात्र कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शाओमी देखील इलेक्ट्रिक व्हेईकल सादर करणार असल्याची बातमी आली होती.
सध्या भारतासह जगभरात इलेक्ट्रिक व्हेईकलची लहर आली आहे. भारतात देखील अनेक अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार व स्कूटर सादर करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यात ऑटो क्षेत्राच्या बाहेरच्या कंपन्यांनी देखील उडी घेतली आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल ची वाढती मागणी बघून आता स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमीने देखील कथितरित्या या क्षेत्रात उतरणार असल्याचे दिसत आहे.
Rushlane च्या ताज्या रिपोर्टनुसार Realme कंपनीने “Vehicles, apparatus for locomotion by land, air or water” अंतगर्त आपलं ट्रेडमार्क नोंदवलं आहे. हे ट्रेडमार्क होल्डिंग कंपनी Realme Mobile Telecommunications (Shenzhen) Co Ltd ने नोंदवलं आहे.
स्मार्टफोन निर्माता कंपनी ऑटोमोबाईल सेगमेंटमध्ये उतरणार असल्याची ही पहिली बातमी नाही. याआधी Apple, Xiaomi, Oppo आणि Huawei देखील इलेक्ट्रिक व्हेईकल सादर करणार असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
रियलमी इलेक्ट्रिक व्हेईकल अंतगर्त इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच करू शकते, असा अंदाज रिपोर्टमध्ये वर्तवण्यात आला आहे. परंतु कंपनीने मात्र याविशीय कोणीतही अधिकृत माहिती दिली नाही. त्यामुळे या बातमीवर कितपत विश्वास ठवावा हे इतक्यात सांगता येणार नाही.