Reliance Acquire Faradion: मुकेश अंबानी इलेक्ट्रीक वाहनांवर राज्य करणार; १० अब्ज मोजून बडी कंपनी विकत घेणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:56 PM2021-12-31T12:56:12+5:302021-12-31T12:56:48+5:30

Reliance Acquire Faradion: रिलायन्स उद्योग समूहाचे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) नव्या वर्षात स्वच्छ ऊर्जा (Green Energy) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे.

reliance new energy solar to acquire faradion limited reliance industries electric vehicles | Reliance Acquire Faradion: मुकेश अंबानी इलेक्ट्रीक वाहनांवर राज्य करणार; १० अब्ज मोजून बडी कंपनी विकत घेणार 

Reliance Acquire Faradion: मुकेश अंबानी इलेक्ट्रीक वाहनांवर राज्य करणार; १० अब्ज मोजून बडी कंपनी विकत घेणार 

googlenewsNext

Reliance Acquire Faradion: रिलायन्स उद्योग समूहाचे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) नव्या वर्षात स्वच्छ ऊर्जा (Green Energy) क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानींचीरिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNRSL) कंपनी तब्बल १० अब्जाहून अधिक रुपये मोजून फॅराडियन लिमिटेड कंपनी विकत घेणार आहे. यासाठीच्या करारावर स्वाक्षरी देखील झाली आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी रिलायन्सकडून ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची (RIL) सहाय्यक कंपनी रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड कंपनी आपल्या विस्तार योजनेअंतर्गत सोडियम-आयन्स सेल्सचं उत्पादन करणाऱ्या फॅराडियन लिमिटेड कंपनीचं अधिग्रहण करणार आहे. रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेडचं १०० टक्के अधिग्रहण रिलायन्सकडून केलं जाणार आहे. याशिवाय आरएनईएसएलच्या नव्या व्यापाराच्या विस्तारासाठी विकास निधीसाठी आगामी काळात २५ मिलियन पाऊंडच्या गुंतवणुकीचाही कंपनीचा मानस आहे. 

RNASL कंपनीकडून फॅराडियन लिमिटेड कंपनीचे ८८.९२ टक्के इक्विटी शेअर्सचं अधिकग्रहण केलं जाणार आहे. नियामक फायलिंगनुसार जानेवारी २०२२ मध्ये या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. फॅराडियचे उर्वरित ११.०८ टक्के इक्विटी शेअर्स रिलायन्स कंपनी आगामी तीन वर्षात अधिग्रहण करणार आहे. 

जगातील टॉप कंपन्यांमध्ये फॅराडियनचा समावेश
सोडियम-आयन बॅटरीचं उत्पादन करणाऱ्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये फॅराडियन लिमिटेड कंपनीचा समावेश आहे. कंपनीनं याआधीच भारतात उत्पादन सुरू करण्याबाबतचे संकेत दिले होते. यासाठीचा शोध सुरू असल्याचं कंपनीनं म्हटलं होतं. सोडियम आयन बॅटरीची प्रणाली लिथियम आयन बॅटरीपेक्षाही अधिक चांगली असल्याचा दावा फॅराडियन कंपनीनं केला आहे. तसं झाल्यास जगात ऑटोमोबाइल, स्टोरेज आणि मोबाइल क्षेत्रात क्रांती घडू शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

Web Title: reliance new energy solar to acquire faradion limited reliance industries electric vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.