Renault च्या 'या' तीन स्वस्त कारवर मिळतेय 50 हजार रुपयांपर्यंतची सूट, किंमत फक्त 4.64 लाखपासून सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 01:42 PM2022-12-05T13:42:32+5:302022-12-05T13:45:13+5:30
कस्टमर्सना कॅश डिस्काउंटपासून ते एक्सचेन्ज बोनस आणि स्क्रॅपेज डिस्काउंट देखील ऑफर करण्यात येत आहे. तर जाऊन घेऊयात, कोणत्या कारवर किती डिस्काउंट देत आहे कंपनी...
जर आपण एखादी स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि रेनॉल्ट ब्रँडवर आपला विश्वास असेल, तर आपल्यासाठी एक चांगली संधी आहे. फ्रेंच ऑटोमेकर रेनॉल्टने विक्रीला चालना देण्यासाठी आपल्या वाहनांवर 50,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे. कंपनीकडून डिसेंबर महिन्यात Triber, KWID आणि Kiger सारख्या कारवर डिस्काउंट देण्यात येत आहे. कस्टमर्सना कॅश डिस्काउंटपासून ते एक्सचेन्ज बोनस आणि स्क्रॅपेज डिस्काउंट देखील ऑफर करण्यात येत आहे. तर जाऊन घेऊयात, कोणत्या कारवर किती डिस्काउंट देत आहे कंपनी...
Renault Kwid (किंमत 4.64 लाख रुपयांपासून सुरू) -
ही कंपनीची एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे. हिचा सामना थेट मारुती ऑल्टोसोबत असतो. या कारवर थेट 35 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. यात 15 हजार रुपयांच्या एक्सचेन्ज बेनिफिट्सचाही समावेश आहे. या कारला 1.0 लीटर पेट्रोल आणि 0.8 लीटर पेट्रोल असे दोन इंजिन ऑप्शन्स आहेत.
Renault Triber (किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू) -
Renault Triber ही देशातील सर्वात स्वस्त एमपीव्ही कारपैकी एक आहे. या गाडीवर कंपनी 50 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देत आहे. या 7 सीटर कारमध्ये 1-लिटर, नॅचुरली एस्पिरेटेड, थ्री-सिलेंडर पेट्रोल इंजिन (72PS आणि 96Nm) मिळते.
Renault Kiger (किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू) -
Renault Kiger ही कंपनीची एक सब-कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार आहे. या कारवर जास्तीत जास्त 35 हजार रुपयांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या एसयूव्हीमध्ये LED हेडलाइट्स, मस्क्युलर बोनट, डुअल टोन अलॉय व्हीलसह 8 इंचाचे टचस्क्रीन सिस्टम आणि 4 एअरबॅग्स मिळतात.