रेनॉल्टकडून डस्टरचे लाँचिंग; मिळणार 1.3 लीटरचे नवे पेट्रोल इंजिन; मायलेज वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 12:47 PM2020-08-19T12:47:33+5:302020-08-19T12:48:45+5:30
नव्या डस्टरमध्ये जुने 1.5 लीटर पेट्रोल इंजिनही मिळणार आहे. मात्र, या व्हेरिअंटची किंमत 8.59 लाखांपासून सुरु होणार आहे.
मुंबई : रेनॉल्टने भारतीय बाजारात 1.3L टर्बो पेट्रोल इंजिन लाँच केले असून हे इंजिन डस्टर एसयुव्हीमध्ये देण्यात आले आहे. या नव्या इंजिनाची डस्टर तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होणार आहे. याची किंमत 10.49 लाख रुपयांपासून सुरु होणार आहे.
नव्या डस्टरमध्ये जुने 1.5 लीटर पेट्रोल इंजिनही मिळणार आहे. मात्र, या व्हेरिअंटची किंमत 8.59 लाखांपासून सुरु होणार आहे. 1.3L टर्बो पेट्रोल इंजिन हे शक्तीशाली, टर्बो चार्ज्ड व बीएसव्हीआयमध्ये बसणारे आहे. हे इंजिन 16.5 किमीचे मायलेज देते. तर सीव्हीटी इंजिन 16.42 चे मायलेज देते.
नव्या डस्टरमध्ये असून फ्रंट ग्रील, टेल गेट, रुफ रेल्स,फॉग लॅम्पमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच ट्राय-विंग्ड फूल क्रोम ग्रील, ड्यूएल टोन बॉडी कलर देण्यात आले आहेत. या डस्टरला 205 एमएमचा ग्राऊंड क्लिअरंस आहे. महत्वाचे म्हणजे कारमध्ये बसण्यापूर्वी केबिन थंड करण्याची सोय आहे. की- फॉबच्या सहाय्याने इंजिन सुरु करून एसी चालू करता येतो. याशिवाय अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो, व्हॉईस रेक्गनायजेशन व इकोगाईडची सोय देण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी फ्रंट, साईड तसेच पेडेस्ट्रीयन क्रॅशची सुविधा देण्यात आली आहे. एबीएस, ईबीडी, चालकासह पॅसेंजर एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड अलर्टची सुविधा आहे. तसेच रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रोनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) आणि हिल-स्टार्ट असिस्ट सारखी फिचरही देण्यात आली आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुकेश अंबानी आता औषधे ऑनलाईन पुरविणार; Amazon ला धोबीपछाड, Netmeds खिशात
Gold Rates Today एका दिवसासाठीच चमकले! सोने पुन्हा घसरले; झटपट जाणून घ्या आजचा दर
जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता
पत्नीशी नाजूक संबंधांची शंका; सोनाराला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
बाबो! झोपलेल्या तरुणाच्या छातीवर येऊन बसली सिंहीण; पहा पुढे काय घडले?
वॉन्टेड! 2000 रुपये पगार पण चिनी कंपन्यांचा होता संचालक; ऐकून वडिलांना बसला धक्का