Scorpio पेक्षा महागडी आहे 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 04:41 PM2024-10-19T16:41:08+5:302024-10-19T16:42:53+5:30
Renault Electric Motorcycle Launch : रेनॉल्टची इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्रेंच स्टार्ट-अप कंपनी Ateliers Heritage Bikes ने बनवली आहे.
Renault Electric Motorcycle Launch : रेनॉल्टने पॅरिस मोटर शोमध्ये 4 ई-टेक इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. रेनॉल्टच्या इलेक्ट्रिक कारनेच नव्हे तर इतर प्रोडक्टसनेही ऑटो इंडस्ट्रीचे लक्ष वेधून घेतले आहे. या मोटर शोमध्ये, रेनॉल्टने हेरिटेज स्पिरिट स्क्रॅम्बलरची झलक दाखवली. जी एक इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे. या ईव्हीची किंमत 23,340 युरो आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 21.2 लाख रुपये आहे. तर भारतात मिळणाऱ्या Mahindra Scorpio N ची किंमत या ईव्ही पेक्षा कमी आहे. स्कॉर्पिओची एक्स-शोरूम किंमत 13.85 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.54 लाख रुपयांपर्यंत जाते.
रेनॉल्टची इलेक्ट्रिक मोटरसायकल फ्रेंच स्टार्ट-अप कंपनी Ateliers Heritage Bikes ने बनवली आहे. या इलेक्ट्रिक मोटरसायकलची किंमत भारतात मिळणाऱ्या ईव्हीपेक्षा खूप जास्त आहे. या मोटरसायकलचे फक्त लिमिटेड मॉडेल बाजारात आणले आहेत. कंपनीने या मोटरसायकलचे बुकिंगही सुरू केले आहे. तुम्ही आज ही मोटरसायकल बुक केल्यास, त्याची डिलिव्हरी 2025 मध्ये मिळू शकते. दरम्यान, रेनॉल्टने या मोटर शोमध्ये एक मिनी-कॅरव्हॅन, एक विमान आणि एक जलवाहन देखील सादर केले आहे.
दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
रेनॉल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकलचे स्टँडर्ड आणि 50 व्हर्जन असे दोन व्हेरिएंट ग्लोबल मार्केटमध्ये आले आहेत. 50 व्हर्जनच्या मॉडेलची किंमत 21.2 लाख रुपये आहे. तर स्टँडर्ड मॉडेलची किंमत 22.7 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की, स्टँडर्ड मॉडेलचा टॉप-स्पीड 99 किमी प्रतितास आहे, तर 50 व्हर्जनचा टॉप-स्पीड 45 किमी प्रतितास आहे.
मोटरसायकलची डिझाईन
रेनॉल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल ही निओ-रेट्रो स्क्रॅम्बलर आहे. या मोटरसायकलला एलईडी हेडलाइट्ससोबत एलईडी डीआरएलही बसवण्यात आले आहेत. या मोटरसायकलची सीट सिंगल पीस रिब्ड डिझाइनसह येते. तसेच, रेनॉल्टने आपल्या मोटरसायकलमध्ये खूप मोठा हँडलबार दिला आहे, ज्यात सर्कुलर बार-एंड मिरर आहेत. मोटरसायकलच्या फ्यूल टँकमध्ये ट्रेडिशनल मोटारसायकलसारखे एलिमेंट्स देण्यात आले आहेत.
मोटरसायकलची रेंज किती?
या रेनॉल्ट मोटरसायकलमध्ये 4.8 kWh चा बॅटरी पॅक आहे. या मोटरसायकलमध्ये बसवण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटरमुळे 10 bhp ची पीक पॉवर मिळते. तसेच, 280 Nm चा पीक टॉर्क मिळते. कंपनीचा दावा आहे की, ही रेनॉल्ट इलेक्ट्रिक मोटरसायकल सिंगल चार्जिंगमध्ये 110 किलोमीटरची रेंज देते.