Renault Kwid Electric : कमी किंमतीत लाँच झाली रेनोची इलेक्ट्रिक कार; सिंगल चार्जवर जाणार 305km
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 02:44 PM2021-03-20T14:44:14+5:302021-03-20T14:46:12+5:30
Renault Kwid (Dacia Spring) Electric: कंपनीनं लाँच केली स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रिक कार
फ्रान्सची वाहन उत्पादन करणारी कंपनी रेनो आपल्या भारतातील एन्ट्री लेव्हल कार kwid साठी प्रसिद्ध आहे. किंमतही कमी त्यात मालयेजही जास्त मिळत असल्यानं भारतात अनेक लोकांनी या कारला पसंती दिली. या कारच्या ईलेक्ट्रिक व्हर्जनचीही मोठ्या कालावधीपासून चर्चा सुरू होती. सध्या कंपनीनं Dacia Spring या नावानं ही कार फ्रान्समध्ये लाँच केली आहे. या कारची किंमत 16,990 युरो (विना अनुदान) ठेवण्यात आली आहे.
Dacia रेनोचाच एक सिस्टर ब्रँड आहे आणि दोन्ही कंपन्या एक दुसऱ्यांच्या उत्पादनांना रिबेज करतात. Dacia Spring WLTP च्या अनुसार ही कार एकूण 230km ची रेंज प्रदान करते. तर याची WLTP सिटी रेंज 305km आहे. या कारमध्ये क 24.7kwh बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. ती 125Nm टॉर्कसोबत 44PS ची पॉवर देते.
दोन व्हेरिअंटमध्ये विक्री
फ्रान्समध्ये या कारची विक्री दोन व्हेरिअंटमध्ये करण्यात येते. याच्या सर्वात बेसिक व्हेरिअंटमध्ये एसी, ब्लूटूथ ऑडिओ सिस्टम, एलईडी डीआरएल आणि फॅब्रिक अपहोल्स्ट्री सारख्या सुविधा देण्यात येतात. या कारची किंमत 16,990 युरो म्हणजेच 15 लाख रूपये इतकी आहे. तर दुसऱ्या व्हेरिअंटमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, रिअर कॅमेरा आणि रिअर पार्किंग सेन्सरसह 7 इंचाचा टचस्क्रिन सिस्टम मिळतो. याची किंमत 18,490 युरो म्हणजेच जवळपास 16 लाख रूपये इतकी आहे. नुकतीच कंपनीनं चीनमध्येही या कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच केलं आहे. भारतात 2022 मध्ये ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. याची किंमत 10 लाखांच्या जवळपास असण्याची शक्यता असण्याची शक्यता आहे.