Renault Scrappage Policy: रेनोकडून स्क्रॅपिंग पॉलिसी लाँच; जुनी दुचाकी, कार दिल्यास मिळणार डिस्काऊंट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 01:35 PM2021-08-17T13:35:10+5:302021-08-17T13:38:23+5:30
Renault Scrappage Policy Launch: देशात नुकतीच वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा करण्यात आली आहे. ही पॉलिसी सुरु होण्यास वेळ लागणार आहे. त्या आधीच कंपन्यांनी वातावरणाचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे.
देशात नुकतीच वाहनांच्या स्क्रॅपिंग पॉलिसीची घोषणा करण्यात आली आहे. या स्क्रॅपिंग पॉलिसीच्या वातावरणाचा फायदा उठविण्याचा निर्णय रेनोने घेतला आहे. फ्रान्सची प्रमुख कंपनी रेनो इंडिया (Renault India) ने आपल्या कारवर ऑगस्ट महिन्यासाठी आकर्षक डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली आहे.
Scrappage Policy benefits: स्क्रॅपिंग पॉलिसीचे फायदेच फायदे; जाणून घ्या वाहन मालकांना काय मिळणार...
रेनो भारतात चार कार विकते. यामध्ये डस्टर (Duster), क्विड (Kwid), Triber (ट्राइबर) आणि काइगर (Kiger) या चार कार भारतीय रस्त्यांवर धावत आहेत. कंपनीने या गाड्यांची ऑगस्ट 2021 मध्ये मागणी वाढविण्यासाठी सर्वच्या सर्व चारही कारवर डिस्काऊंट आणि स्कीम देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये रोख सूट, एक्स्चें बोनस, अतिरिक्त डिस्काऊंट आदींसह कार्पोरेट डिस्काऊंटही दिला जात आहे. कंपनीने आपल्या वाहनांच्या खरेदीवर स्क्रॅपिंग पॉलिसीचा देखील फायदा देणार आहे.
Renault 10 years celebration: यंदा घ्या, 2022 मध्ये पैसे भरा! रेनोला भारतात 10 वर्षे पूर्ण; नवी कार लाँच, भन्नाट ऑफर्स
रेनोने आपल्या कारवर 'बाय नाउ, पे इन 2022' स्कीम लाँच केली आहे. यानुसार सहा महिने कर्जाच्या ईएमआयवर सूट देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे रेनो आपल्या R.E.Li.V.E स्क्रॅपेज पॉलिसीचा फायदा देणार आहे. यानुसार 10000 रुपयांपर्यंतचा विशेष फायदा देण्यात येणार आहे. यासाठी CERO रीसाइक्लिंग सोबत हात मिळविण्यात आला आहे. यानुसार ग्राहक त्यांची जुनी दुचाकी, चारचाकी स्क्रॅप करू शकतात. याद्वारे या वाहनाची किंमत ठरविली जाईल आणि ती नव्या कारच्या किंमतीत वळती केली जाईल.
Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...
आपल्या सेलिब्रेशन ऑफरअंतर्गत रेनो ने 6 ते 15 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि केरळसह पूर्ण देशभरात 'फ्रीडम कार्निव्हल'ची घोषणा केली आहे. कंपनीने या राज्यांमध्ये 90000 रुपयांपर्यंतचा फायदा आणि वेगवेगळे फेस्टिव्ह ऑफर लाँच केले आहेत. या राज्यांमध्ये गणेशोत्सव आणि ओणम सारख्या उत्सवांमुळे मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
'Buy Now, Pay in 2022'
फ्रीडम कार्निव्हल'मध्येच रेनो कार बुक करणाऱ्या ग्राहकांना आणखी एक मोठी ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये एक्स्चेंज बोनस व्यतिरिक्त कंपनीने क्विड, ट्रायबर आणि काइगर या कार खरेदी केल्यास 'Buy Now, Pay in 2022' स्कीमचीही घोषणा केली आहे. या योजनेनुसार ग्राहक रेनोच्या कार खरेदी करताना हा पर्याय निवडू शकणार आहेत. यामध्ये कार आता खरेदी करायची आणि सहा महिन्यांनी म्हणजेच 2022 पासून त्याचे हप्ते देण्यास सुरुवात करायाची आहे.