तात्काळ रिन्यू करा आपल्या गाडीचा विमा, एप्रिलपासून वाढणार थर्ड पार्टी इन्शुरन्सची रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 11:53 AM2022-03-06T11:53:34+5:302022-03-06T12:02:09+5:30
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सर्व वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमची रक्कम वाढवण्याची तयारी करत आहे.
नवी दिल्ली: तुमच्या वाहनाचा विमा संपणार असेल तर लवकर त्याचे नूतनीकरण करुन घ्या. कारण एप्रिल 2022 पासून या कामासाठी तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागू शकतात. केंद्र सरकारने एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) मसुदा अधिसूचनेत ही माहिती समोर आली आहे. या प्रस्तावासाठी सरकार 14 मार्चपर्यंत सूचना आणि हरकती घेत आहे, त्यानंतर थर्ड पार्टी इन्शुरन्सचा बेस प्रीमियम वाढवला जाईल.
इलेक्ट्रिक वाहनांवर 15% सूट
खाजगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर-मालवाहकांसह व्यावसायिक वाहनांच्या विम्यावर 15 टक्के सूट दिली जाणार आहे. इको फ्रेंडली वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलले जाणार आहे. हायब्रीड इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार 7.5 टक्के सूट देण्याची तयारी करत आहे. 1.0-लिटर इंजिन असलेल्या कार, 1,500 cc इंजिन असलेल्या कार आणि 150-350 cc व्यतिरिक्त अधिक शक्तिशाली बाइक्सवर, ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा अधिक विमा बेस प्रीमियम भरावा लागेल.
थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय
व्यावसायिक वाहन विम्याच्या मूळ प्रीमियममध्येही वाढ होणार आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्स अंतर्गत, स्वतःचे वाहन जास्त नुकसान कव्हर करते आणि वाहन मालकांनी ते खरेदी करणे अनिवार्य आहे. हा विमा थर्ड पार्टीच्या मृत्यूलाही कव्हर करतो. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मार्च 2022 च्या अखेरीस विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्याबाबतच्या मसुदा अधिसूचनेबाबत सूचना मागवल्या आहेत.