नदी...वाळू... की पर्वतरांगा! भारतीय लष्कराला मिळाला नवा 'घोडा'; टेस्टिंगमध्ये एकच पास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 06:04 PM2023-07-21T18:04:12+5:302023-07-21T18:04:35+5:30

टोयोटाचा नवा पिकअप ट्रक Toyota Hilux भारताच्या सेवेत हजर झाला आहे.

River...sand...or mountains! Indian Army gets a new 'horse' Toyota Hilux; A single pass in testing | नदी...वाळू... की पर्वतरांगा! भारतीय लष्कराला मिळाला नवा 'घोडा'; टेस्टिंगमध्ये एकच पास

नदी...वाळू... की पर्वतरांगा! भारतीय लष्कराला मिळाला नवा 'घोडा'; टेस्टिंगमध्ये एकच पास

googlenewsNext

भारतीय लष्कराला गेल्या काही काळापासून एका अशा दणकट, दाकदवर एसयुव्हीची गरज होती, जी पाणी असो की रेती की उंच उंच पर्वतरांगा तितक्याच चपळाईने सारे सर करेल. जवळपास दोन महिन्यांच्या खडतर चाचणीनंतर ही मनासारखी एसयुव्ही अखेर लष्कराला मिळाली आहे. 

टोयोटाचा नवा पिकअप ट्रक Toyota Hilux भारताच्या सेवेत हजर झाला आहे. कंपनीने या ताकदवर एसयुव्हीची पहिली बॅच भारतीय सैन्याकडे सोपविली आहे. ताफ्यात सामील करण्यापूर्वी भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडने दोन महिने खडतर परिस्थितीत या एसयुव्हीची चाचणी केली आहे. 

पिक-अप ट्रकची 13,000 फूट उंचीवर खडबडीत भूप्रदेश ते उणे तापमानात वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. टोयोटा हायलक्स ही प्रत्येक बाबतीत सरस ठरली आणि त्यानंतर तिचा समावेश पक्का करण्यात आला. अलीकडेच महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकचा देखील भारतीय लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यात आला होता. परंतू, तिचा वापर वेगळ्या प्रदेशासाठी निश्चित करण्यात आला होता. 

लष्कराच्या आवश्यकतेनुसार एसयूव्हीमध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ते नियमित मॉडेलपेक्षा वेगळे आहे. याशिवाय टाटा सफारी स्टॉर्म (GS800) आणि Tata Xenon पिक-अप आधीच लष्कराच्या पथकात समाविष्ट आहेत. Toyota Hilux ही मजबूत पेलोड क्षमतेसह त्याच्या विशिष्ट देखाव्यासाठी आणि शक्तिशाली इंजिनसाठी ओळखली जाते.

Web Title: River...sand...or mountains! Indian Army gets a new 'horse' Toyota Hilux; A single pass in testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.