जगातील सर्वात महागडी कार कोणती? या महागड्या कारची किंमत किती? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 04:49 PM2024-08-08T16:49:31+5:302024-08-08T16:53:58+5:30
Most Expensive Car Rolls-Royce : जगातील सर्वात महागडी कार कोणती? हे जाणून घेण्यात लोकांना उत्सुकता असते. त्यामुळे जगातील सर्वात महागड्या कारचे नाव काय आहे आणि या कारची किंमत काय आहे, याबद्दल जाणून घ्या.
Most Expensive Car Rolls-Royce : जगभरातील ऑटो मार्केटमध्ये दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. जगात एकापाठोपाठ एक अनेक नवीन कार लाँच होत आहेत. यामध्ये काही कारच्या किमती सर्वसामान्यांच्या बजेटमधील आहेत, तर काही कारच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थितीत जगातील सर्वात महागडी कार कोणती? हे जाणून घेण्यात लोकांना उत्सुकता असते. त्यामुळे जगातील सर्वात महागड्या कारचे नाव काय आहे आणि या कारची किंमत काय आहे, याबद्दल जाणून घ्या.
जगभरात आतापर्यंत अनेक आलिशान कार लाँच झाल्या आहेत. मात्र, यामध्ये जगातील सर्वात महागडी कार म्हणजे रोल्स-रॉयस ला रोज नॉयर ड्रॉपटेल (Rolls-Royce La Rose Noire Droptail) आहे. रोल्स-रॉयसने ऑगस्ट २०१३ मध्ये ही आलिशान कार जागतिक बाजारात लाँच केली होती. ही कार जवळपास ३० मिलियन डॉलर्सच्या किंमतीसह बाजारात आणली होती. त्यावेळी भारतीय चलनानुसार या कारची किंमत २११ कोटी रुपये होती.
या रोल्स रॉयस कारमध्ये फक्त दोन लोक बसण्याची कॅपॅसिटी आहे. या सुपरकारचा हार्डटॉपही काढला जाऊ शकतो. रोल्स-रॉयस ला रोज नॉयर ड्रॉपटेलमध्ये ट्विन-टर्बो ६.७५ लिटर, V-१२ इंजिन बसवण्यात आले आहे. या लक्झरी कारचे इंजिन ५६३ bhp पॉवर आणि ८२० Nm टॉर्क जनरेट करते. या कारची बॉडी कार्बन, स्टील आणि ॲल्युमिनियमपासून बनलेली आहे.
दरम्यान, या रोल्स रॉयस कारची खास म्हणजे, जेव्हा ती वेगवेगळ्या अँगलमधून पाहिली जाते, तेव्हा कारच्या बॉडीमधील कलरचे ट्रांझिशन दिसून येते. जवळपास १५० टेस्ट केल्यानंतर या कारचे बॉडी पेंट फायनल करण्यात आले आहे. या आलिशान कारचे डिझाईन Black Baccara rose च्या पाकळ्या लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. या प्रकारच्या पाकळ्या फ्रान्समध्ये आढळतात.