Rolls-Royce चं ऑल इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट ठरलं जगातील जलद EV; टॉप स्पीड जाणून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:47 PM2021-11-22T20:47:04+5:302021-11-22T20:47:52+5:30

Rolls-Royce नं आपलं इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट Spirit of Innovation हे जगातील सर्वात वेगवान ऑल इलेक्ट्रीक व्हेइकल असल्याची घोषणा केली.

Rolls Royce says its all electric aircraft is world's fastest electric vehicle | Rolls-Royce चं ऑल इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट ठरलं जगातील जलद EV; टॉप स्पीड जाणून व्हाल चकीत

Rolls-Royce चं ऑल इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट ठरलं जगातील जलद EV; टॉप स्पीड जाणून व्हाल चकीत

Next

Rolls-Royce नं आपलं इलेक्ट्रीक एअरक्राफ्ट Spirit of Innovation हे जगातील सर्वात वेगवान ऑल इलेक्ट्रीक व्हेइकल असल्याची घोषणा केली आहे. कंपनीचं हे एअरक्राफ्ट तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरापर्यंत ५५५.९ किमी प्रति तास या वेगानं उडण्यात यशस्वी ठरल्याचंही सांगम्यात आलं. या एअरक्राफ्टसोबत कंपनीनं Siemens च्या इ-एअरक्राफ्ट Extra 330 LE Aerobatic चा विक्रम मोडला आहे. सिमेन्सच्या या एअरक्राफ्टनं २०१७ मध्ये २३१.४ किमी प्रति तासाच्या वेगानं उड्डाण केलं होतं.

रोल्स रॉईसच्या या एअरक्राफ्टनं ब्रिटनच्या Ministry of Defence’s Boscombe Down च्या एअरक्राफ्ट टेस्टिंग साईटवर १५ मिनिटांपर्यंत ५३२.१ किमी प्रति तास या वेगानं उड्डाण केलं. तसंच विशेष म्हणजे यानं कमी वेळात ३ हजार मीटरपर्यंत पोहोचण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे.

या परफॉर्मन्सदरम्यान या एअरक्राफ्टचा कमाल वेग हा ६२३ किमी प्रति तास इतका होता. या स्पीडमुळेच हे जगातील सर्वात वेगानं उड्डाण करणारं ई एअरक्राफ्ट बनलं आहे. या एअरक्राफ्टनं केलेला जागतिक विक्रम हा FAI नं देखील व्हेरिफाय केला आहे. या इलेक्ट्रीक एअरक्राफ्टमध्ये 400kw च्या इलेक्ट्रीक मोटरचा वापर करण्यात आला आहे. ही मोटर 500hp पर्यंत पॉवर जनरेट करते. चाचणीदरम्यान यात टेस्ट पायलटशिवाय कंपनीचे डायरेक्टर ऑफ फ्लाईट ऑपरेशन्स Phill O'Dell हेदेखील उपस्थित होते. या विक्रमासाठी रोल्स रॉयसनं एव्हिएशन एनर्जी स्टोरेज स्पेशियालिटी YASA सोबत भागीदारी केली होती. 

Web Title: Rolls Royce says its all electric aircraft is world's fastest electric vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.