Royal Enfield ची खास ऑफर; नवीन बाईक विकत घ्या, आनंद घ्या आणि मग कंपनीलाच विका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:44 PM2023-10-16T21:44:36+5:302023-10-16T21:45:21+5:30
ग्राहकांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी मासिक ईएमआय तसेच त्यांच्या रॉयल एनफिल्ड मोटरसायकलची गॅरंटीड बायबॅक व्हॅल्यू आहे.
नवी दिल्ली : रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) ओटीओ कॅपिटलसह अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे. हा नवीन प्रोग्राम ग्राहकांसाठी एक स्मूथ आणि सीमलेश ओनरशिप एक्सीरियंस सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सादर करण्यात आला आहे, असा दावा रॉयल एनफिल्डने केला आहे. तसेच, हा ग्राहकांना त्रासमुक्त अनुभव देण्यात येईल, ज्यामुळे रॉयल एनफिल्ड मोटरसायकलपर्यंत पोहोच वाढेल आणि अपग्रेड करणे सोपे होईल, असाही दावा अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्राममध्ये करण्यात आला आहे.
या बायबॅक प्रोग्राममध्ये 1-3 वर्षांपर्यंतचा फ्लेक्सिबल कालावधी, 45 टक्क्यांपर्यंत कमी ईएमआय, मुदतीच्या आधारावर 77 टक्क्यांपर्यंत गॅरंटीड बायबॅक व्हॅल्यू आणि कार्यकाळाच्या शेवटी कॅश बॅक इंसेंटिव्ह दिला जातो. म्हणजेच, मोटारसायकल वापरल्यानंतर तुम्ही ती कंपनीलाच विकू शकता, जिथे तुम्हाला 77 टक्क्यांपर्यंत व्हॅल्यू मिळू शकते.
अॅश्युअर्ड बायबॅक कालावधीच्या शेवटी ग्राहकांना निवडण्यासाठी अनेक पर्याय असतील. ग्राहक आपल्या जुन्या मोटारसायकलचा नवीन रॉयल एनफिल्ड मोटरसायकलसाठी ट्रेड करू शकतात किंवा ते कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवू शकतात किंवा त्यांची मोटारसायकल कंपनीला परत करू शकतात. हे सर्व पर्याय ग्राहकाकडेच राहणार आहेत.
12 शहरांमधील डीलरशिपवर प्रोग्राम उपलब्ध
ग्राहकांसाठी सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी मासिक ईएमआय तसेच त्यांच्या रॉयल एनफिल्ड मोटरसायकलची गॅरंटीड बायबॅक व्हॅल्यू आहे. सुरुवातीला हा अॅश्युअर्ड बायबॅक प्रोग्राम दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, लखनौ, जयपूर, भोपाळ, इंदूर, अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नई या 12 शहरांमधील डीलरशिपवर उपलब्ध असणार आहे. तसेच, पुढील काळात या प्रोग्रामचा विस्तार आणखी शहरांमध्ये होईल.