Royal Enfield Bikes : रॉयल एनफिल्डसाठी सोन्याचं अंड देणारी ठरली ही बाईक; याच्यासमोर बुलेट, हंटरही फेल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:54 PM2023-03-27T12:54:34+5:302023-03-27T12:55:00+5:30
भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे.
भारतीय बाजारपेठेत रॉयल एनफिल्डची (Royal Enfield) क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. रॉयल एनफिल्डचं देशांतर्गत बाजारात सर्वाधिक विक्री होणारं मॉडेल क्लासिक 350 होते, तर कंपनीच्या दोन 650cc बाइक्सने जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेतलं आहे. रॉयल एनफिल्डने फेब्रुवारी 2023 मध्ये देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेत वर्ष-दर-वर्ष वाढ नोंदवली आहे. परंतु, जानेवारी 2023 मध्ये कंपनीची देशांतर्गत विक्री इतकी चांगली नव्हती, परंतु MoM आधारावर निर्यातीत मात्र सुधारणा झाली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रॉयल एनफिल्डची एकूण विक्री (देशांतर्गत + निर्यात) 71,544 युनिट्स होती.
क्लासिक 350 टॉपवर
रॉयल एनफिल्डने फेब्रुवारी 2023 मध्ये देशांतर्गत बाजारात 64,436 युनिट्सची विक्री नोंदवली. तथापि, जानेवारी 2023 मध्ये 3,266 युनिट्सवर विकल्या गेलेल्या 67,702 युनिटच्या तुलनेत MoM विक्रीत 4.82 टक्क्यांनी घट झाली. रॉयल एनफील्ड क्लासिक 350 फेब्रुवारी 2023 मध्ये 27,461 युनिट्ससह विक्रीच्या चार्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 30,082 युनिटच्या तुलनेत यात 8.71 टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी 2023 मध्ये विक्री केवळ 5.08 टक्क्यांनी वाढून 26,134 युनिट्स झाली. RE Classic 350 हे केवळ कंपनीच्या विक्री चार्टमध्ये अव्वल स्थानावर नव्हते, तर गेल्या महिन्यात देशात विकल्या गेलेल्या 350cc बाईकच्या यादीतही हे मॉडेल प्रथम क्रमांकावर होते.
हंटर दुसऱ्या क्रमांकावर
नवीन हंटर 350 फेब्रुवारी 2023 मध्ये 12,925 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर होती. जानेवारी 2023 मध्ये विक्री झालेल्या 16,574 युनिटच्या तुलनेत विक्रीत 15 टक्क्यांनी घट झाली आहे. त्याच वेळी, बुलेट-350 च्या विक्रीत 27.99 टक्के वाढ झाली आहे. बुलेट-350 विक्री फेब्रुवारी 2022 मध्ये 6,432 युनिट्स आणि जानेवारी 2023 मध्ये 9,685 युनिट्स होती. जानेवारी 2023 च्या तुलनेत MoM विक्रीतील ही घट 14.31 वरून 12.78 पर्यंत कमी झाली.
निर्यातीत झाली वाढ
रॉयल एनफिल्डच्या निर्यातीबद्दल बोलायचं झालं तर वर्ष दर वर्ष आमि एमओएम दोन्हीमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपनीनं 7,108 युनिट्सची निर्यात केली. न्यू हंटर 350 नं 1,645 युनिट्सची निर्यात केली, परंतु जानेवारीच्या तुलनेत यात 9.12 टक्क्यांची घट झाली आहे.